Nijjar Murder Case मधील चारही आरोपींना कॅनडाच्या न्यायालयाने दिला जामीन; जस्टिन ट्रुडो यांच्या अडचणी वाढणार

392
कॅनडामधील खलिस्तानी हरदीप सिंग निज्जर हत्याकांडप्रकरणी (Nijjar Murder Case) मोठा निर्णय समोर आला आहे. या निर्णयात, या प्रकरणात सहभागी असलेल्या चारही आरोपींना कॅनडाच्या न्यायालयानेच जामीन मंजूर केला आहे. आरोपींना जामीन मिळाल्याने कॅनडा सरकार आणि पोलिसांना मोठा धक्का बसला आहे. पुढील सुनावणी आता ११ फेब्रुवारी २०२५ रोजी होईल. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातील चारही आरोपींना कायदेशीर सुनावणी होईपर्यंत जामिनावर मुक्त केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चारपैकी तीन प्रतिवादी व्हिडिओद्वारे सर्वोच्च न्यायालयात हजर झाले तर चौथ्या प्रतिवादीचे प्रतिनिधित्व एका वकिलाने केले.

पोलिस न्यायालयात हजर झाले नव्हते 

खरं तर, या प्रकरणात कॅनेडियन पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कनिष्ठ न्यायालयात पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्याने पोलिस न्यायालयात हजर झाले नाहीत. पोलिसांची ही निष्क्रियता पाहून सर्वोच्च न्यायालयाने चारही आरोपींना जामिनावर सोडले. ज्या चार आरोपींना सोडण्यात आले आहे, त्यांची नावे करण ब्रार, अमनदीप सिंग, कमलप्रीत सिंग आणि करणप्रीत सिंग अशी आहेत. कॅनडाच्या सरकारी कागदपत्रांनुसार, आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात नाहीत.

मे महिन्यात केलेली अटक 

या आरोपींना २०२४ च्या मे महिन्यात निज्जर हत्याकांडात (Nijjar Murder Case) अटक करण्यात आली होती. रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिस (RCMP) च्या इंटिग्रेटेड होमिसाईड इन्व्हेस्टिगेशन टीम (IHIT) ने त्यांना खून आणि हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली अटक केली. यापैकी तीन आरोपी एडमंटनचे रहिवासी होते, तर चौथा आरोपी अमरदीप सिंग याला ११ मे रोजी अटक करण्यात आली. या सर्वांवर प्रथम श्रेणी खून आणि कट रचण्याचे गंभीर आरोप ठेवण्यात आले होते.

काय होतं सगळं प्रकरण? 

१८ जून २०२३ रोजी कॅनडातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरची (Nijjar Murder Case) गोळ्या घालून हत्या करण्यात आली. भारतात अनेक दहशतवादी कारवाया आणि खून प्रकरणात हवा असलेला निज्जर १९९७ मध्ये कॅनडाला पळून गेला. त्याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामधील तणाव आणखी वाढला. कॅनडाने या हत्येसाठी भारताला जबाबदार धरले होते, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले होते.

भारतावर केला आरोप 

तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनीही या हत्येत भारताचा सहभाग असल्याचा आरोप केला. त्यांनी १८ सप्टेंबर २०२३ रोजी संसदेत सांगितले की, गेल्या काही आठवड्यांपासून, कॅनेडियन सुरक्षा संस्था भारतीय सरकारी एजंट आणि निज्जरच्या हत्येमधील (Nijjar Murder Case) संभाव्य संबंधाच्या विश्वासार्ह आरोपांची सक्रियपणे चौकशी करत आहेत. नवी दिल्लीने हा आरोप जोरदारपणे फेटाळून लावला आणि कॅनडाने कधीही कोणताही पुरावा सादर केला नाही. या प्रकरणातील चारही आरोपींची सुटका जस्टिन ट्रुडो यांच्या अडचणी आणखी वाढवू शकते. ज्यांनी आधीच राजीनामा जाहीर केला आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.