Ghatkopar मध्ये झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू

75
Ghatkopar मध्ये झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू
Ghatkopar मध्ये झाड कोसळून एका महिलेचा मृत्यू

घाटकोपर पूर्वेला असणाऱ्या लॅव्हेंडर बफ हॉटेलजवळील (Lavender Bough Hotel) ९० फूट रस्त्यावरली खाजगी बागेतील झाड पडल्याने दोन पादचारी महिला जखमी झाल्या. त्यानंतर दोन्ही जखमी महिलांना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दि. ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान यासंदर्भात नागरिकांनी पीडित महिलांची मदत केली. तसेच महापालिकेला घडलेल्या घटनेची माहिती दिली.(Ghatkopar)

(हेही वाचा : आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ५३५ कोटी रुपयांची मदत; मंत्री Makarand Jadhav-Patil यांची घोषणा

दरम्यान राजावाडी रुग्णालयाचे एएमओ डॉ जगदीश जाधव (Dr. Jagdish Jadhav) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन महिला झाड पडल्याने जखमी झाल्या होत्या. त्यातील एक महिला मिनाक्षी बेन यांचा मृत्यू झालेला आहे. तर दुसऱ्या पीडित महिला वंदना शाह यांना एमआरआयसाठी पाठवण्यात आले. (Ghatkopar)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.