Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणी ६ ठिकाणी सर्च ऑपरेशन, कोट्यवधीच्या रक्कमेसह कागदपत्रे जप्त

158
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणी ६ ठिकाणी सर्च ऑपरेशन, कोट्यवधीच्या रक्कमेसह कागदपत्रे जप्त
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणी ६ ठिकाणी सर्च ऑपरेशन, कोट्यवधीच्या रक्कमेसह कागदपत्रे जप्त
टोरेस कंपनीच्या हजारो कोटींच्या घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपीच्या निवासस्थानी आणि टोरेस कंपनीच्या मुंबईतील कार्यालय असे एकूण ६ ठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेकडून गुरुवारी सर्च ऑपरेशन करण्यात आले आहे. या सर्च ऑपरेशन दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती कोट्यवधीची रोख रक्कम आणि काही महत्वाचे पुरावे लागले आहे. टोरेस कंपनीच्या कार्यालय आणि आरोपीच्या निवासस्थानी मिळून आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रक्कमेचा आकडा  सांगण्यात आलेला नसून मोजणी सुरू असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले आहे. (Torres Scam)
टोरेस कंपनीने जवळपास सव्वा लाख गुंतवणूकदारांची १ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कमेची फसवणूक केल्या प्रकरणी सोमवारी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।करण्यात आला आहे. या प्रकरणी टोरेस कंपनीचे संचालक सर्वेश सुर्वे, स्टोर्स मॅनेजर तानिया आणि मॅनेजर व्हॅलेटिना या तिघांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती पाहता या गुन्ह्याचा तपास मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. (Torres Scam)
आर्थिक गुन्हे शाखेने या गुन्ह्याच्या तपासासाठी विशेष तपास पथक गठीत केले असून या पथकाने गुरुवारी अटक आरोपीच्या निवासस्थान कुलाबा, डोंगरी आणि डोंबिवली तसेच टोरेस कंपनीचे लोअर परळ येथील कार्यालय, दादर येथील मुख्य कार्यालय आणि ऑपेरा हाऊस येथील कार्यालय येथे सर्च ऑपरेशन (शोध मोहीम) करून कोट्यवधी रुपयांची रोकड आणि महत्वाचे कागदपत्रे जप्त केली आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून जवळपास हजारो कोटींचा हा घोटाळा आहे, गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात आपली तक्रार करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखा मुंबई तसेच शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात येत आहे, शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात टोरेस कंपनीत गुंतवणूक केलेल्या तक्रारदारांसाठी विशेष सेल स्थापन करण्यात आले असून गुंतवणूकदारांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात आपल्या तक्रारी दाखल कराव्यात असे आवाहन पोलीस उपायुक्त निशानदार यांनी केले आहे. (Torres Scam)
आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केलेली रोकड कोट्यवधीच्या घरात असून ती नेमकी किती आहे हे मोजणी झाल्यावर कळेल असे ही निशानदार म्हणाले. या गुन्हयातील पळून गेलेल्या आरोपीविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या गुन्ह्यातील दोन आरोपी जे सध्या अटकेच्या बाहेर असून त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे की, आम्ही या घोटाळ्याची पूर्व कल्पना मुंबई पोलीस, आयकर विभागाला काही महिन्यांपूर्वी दिली होती, मात्र शिवाजी पार्क पोलीस आणि आयकर विभाग आणि नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे सेल ने त्यांना काही महिन्यांपूर्वी समन्स करून चौकशीसाठी बोलावले होते. (Torres Scam)
या घोटाळ्याची पोलिसांना आणि सरकारी यंत्रणेला काही महिन्यांपूर्वीच कुणकुण लागली होती तर पोलिसांनी किंवा आयकर विभागाने या बाबत चौकशी केली असती तर एवढा मोठा घोटाळा थांबवता आला असता असा सवाल गुंतवणूकदारा कडून करण्यात येत आहे. (Torres Scam)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.