राज्यातील मागासलेल्या धनगर समाजाच्या उन्नतीसाठी सुभेदार मल्हार होळकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेची स्थापना करून ५०० कोटी रुपये निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. (Gopichand Padalkar)
(हेही वाचा- महात्मा फुले जन आरोग्य योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा; मंत्री Prakash Abitkar यांचे आवाहन)
मुख्यमंत्र्यांची भेट घेताना पडळकर यांनी धनगर समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी विशेष योजना राबविण्याची आवश्यकता असल्याचे नमूद केले. “धनगर समाजासाठी सुभेदार मल्हार होळकर यांचे नाव घेत विशेष संशोधन व प्रशिक्षण संस्था सुरू करणे गरजेचे आहे. या संस्थेमार्फत समाजाला शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी मार्गदर्शन व सहाय्य मिळेल,” असे त्यांनी सांगितले. (Gopichand Padalkar)
धनगर समाजातील तरुणांना रोजगार व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी धोरणांची अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला. या मागणीमुळे धनगर समाजाच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले जाईल, अशी अपेक्षा पडळकर यांनी व्यक्त केली. (Gopichand Padalkar)
(हेही वाचा- STP Projects Mumbai : समुद्रात जाणारे सांडपाणी रोखण्यासाठी सात प्रकल्पांचे काम सुरु; २०२८ पर्यंत पूर्ण होणार)
मुख्यमंत्र्यांनी या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत त्यावर विचार केला जाईल, असे आश्वासन दिले. धनगर समाजाच्या उन्नतीसाठी पडळकर यांच्या या मागणीमुळे सरकारकडून पुढील पाऊल काय उचलले जाईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Gopichand Padalkar)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community