प्रदूषणाच्या पातळीत घट केव्हा होणार? Mumbai High Court ने मुंबई महापालिकेला घेतले फैलावर

50
प्रदूषणाच्या पातळीत घट केव्हा होणार? Mumbai High Court ने मुंबई महापालिकेला घेतले फैलावर
प्रदूषणाच्या पातळीत घट केव्हा होणार? Mumbai High Court ने मुंबई महापालिकेला घेतले फैलावर

मुंबईतील बांधकामे, मेट्रो आणि कोस्टल रोड प्रकल्पामुळे वायू प्रदूषणात भर पडत आहे. त्यापाठोपाठ रेड झोनमध्ये येणाऱ्या इंडस्ट्रीज आणि बेकऱ्यांमुळेही मुंबईची हवा खराब होत असल्याचे एमपीसीबीने (MPCB) प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. त्यावर, मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने, मुंबईतील बेकऱ्या कोळसा व लाकडांवर न चालविता इलेक्ट्रिक किंवा ग्रीन एनर्जीवर चालविण्याची सूचना केली. (Mumbai High Court)

प्रत्यक्षात प्रदूषणाला आळा घालण्याबाबत प्रशासन उदासीन
तसेच, दरवर्षी उद्भवणाऱ्या या समस्येवर काही तोडगा काढण्यात येणार आहे का? न्यायालय (Mumbai High Court) आदेश देते म्हणून काही उपाययोजना आखण्यात येतात. मात्र, त्या केवळ न्यायालयाला दाखविण्यासाठी असतात. प्रत्यक्षात प्रदूषणाला आळा घालण्याबाबत प्रशासन उदासीन आहे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकार (State Govt), महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal Corporation) सुनावलं आहे. (Mumbai High Court)

कॅटरिंगवालेही प्रदूषणात भर घालतात, त्यांना आळा कसा घालणार?
मुंबईत पाच कोटी पाव बनतात, असा उल्लेख एका बातमीत होता. पाव बनविणाऱ्या बेकऱ्यांशिवाय, ढाबे, हॉटेल्स आणि काही कार्यक्रमांसाठी अन्नपदार्थ बनविणारे कॅटरिंगवालेही प्रदूषणात भर घालत आहेत. त्यांना आळा कसा घालणार? त्यावर एमपीसीबीच्या वतीने ॲड. ज्योती चव्हाण यांनी, आतापर्यंत २८७ बेकऱ्यांना नोटीस बजावली असून, त्यांना कोळसा व लाकडाचा वापर करण्यास मनाई केली आहे, असे सांगितले. तर महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील मिलिंद साठे यांनी सांगितले की, बेकऱ्यांनी प्रदूषण केल्यास त्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण करण्यात येणार नाही. त्यावर न्यायालयानेही परवाना देऊ नका, अशी सूचना केली. (Mumbai High Court)

पालिका आयुक्तांनी कोणत्या अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे का?
आम्ही रात्री ८ ते १० पर्यंत फटाके वाजविण्याची मुभा दिली, पण मध्यरात्री १ वाजेपतर्यंत फटाके वाजत होते. प्रशासनाने आमच्या आदेशाचे पालनच केले नाही. प्रदूषणाच्या पातळीत घट केव्हा होणार? प्रशासन सक्रिय उपाययोजना आखण्यात अयशस्वी ठरले आहे. पालिका जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्याला यासाठी जबाबदार धरत नाही, तोपर्यंत ही स्थिती सुधारणार नाही. पालिका आयुक्तांनी कोणत्या अधिकाऱ्यावर कारवाई केली आहे का? त्यांनी तसे करावे मग आम्ही त्यांचे कौतुक करू, असे न्यायालयाने म्हटले. (Mumbai High Court)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.