प्रथमच, CRPF मधील निवृत्त श्वान आता सामान्य नागरिकांना दत्तक घेता येणार

74
प्रथमच, CRPF मधील निवृत्त श्वान आता सामान्य नागरिकांना दत्तक घेता येणार
प्रथमच, CRPF मधील निवृत्त श्वान आता सामान्य नागरिकांना दत्तक घेता येणार

केंद्रीय राखीव पोलिस दलातून (सीआरपीएफ) (CRPF) निवृत्त होणाऱ्या श्वानांना (Retired CRPF dogs) दत्तक घेण्याची संधी आता सर्वसामान्य नागरिकांनाही मिळणार आहे. यासाठी ‘सीआरपीएफ’ (CRPF) ने पहिली ऑनलाइन सेवा सुरू केली आहे. कोणत्याही सुरक्षा दलाकडून त्यांचे प्रशिक्षित श्वान दत्तक दिले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हेही वाचा-प्रदूषणाच्या पातळीत घट केव्हा होणार? Mumbai High Court ने मुंबई महापालिकेला घेतले फैलावर

केंद्रीय दले आणि राज्य पोलिसांकडून त्यांच्या सेवेतून निवृत्त झालेले श्वान नोंदणीकृत एनजीओ किंवा नामांकित संस्थांना संगोपनासाठी दिले जात होते. बेल्जियन शेफर्ड मॅलिनॉइस, जर्मन शेफर्ड, लॅब्राडोर आणि देशी मुधोल हाउंड या चार जातींतील ३० हून अधिक श्वान प्रक्रियेद्वारे दत्तक घेतले जाऊ शकतील. बेंगळुरूजवळील सीआरपीएफच्या विशेष श्वान प्रजनन आणि प्रशिक्षण विद्यालयाद्वारे या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात येईल. (CRPF)

हेही वाचा- आमदार Gopichand Padalkar यांनी केली धनगर समाजासाठी 500 कोटींच्या निधीची मागणी

८ ते १२ वर्षे वयोगटातील हे श्वान असून देशभरातील नक्षलविरोधी, दहशतवादविरोधी शेकडो कारवायांमध्ये ते सहभागी झाले आहेत. माओवाद्यांच्या हल्ल्यांतून, कारवायांतून असंख्य सैनिकांचे प्राण त्यांच्यामुळे वाचले आहेत. बाळू, स्वीटी, वीरू, मोबी, कोको, स्ट्रोल आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांनी स्फोटके शोधणे, गस्त अशी कामगिरी पार पाडली आहे. श्वान दत्तक घेणे विनामूल्य असून, दत्तक घेण्यासाठी या श्वानांची माहिती आणि छायाचित्रे पाहण्यासाठी ‘सीआरपीएफ’ची वेबसाइट पाहता येईल. तसेच त्यासाठी एक फॉर्म भरणे आवश्यक असेल. या श्वानांचे पालनपोषण कसे करणार, त्यांच्यासोबत कोण असेल, त्यांची निवासव्यवस्था कशी असेल याचा तपशील द्यावा लागेल. (CRPF)

हेही वाचा- वाढवण-नाशिक हायस्पीड कनेक्टिव्हिटी तयार करा; CM Devendra Fadnavis यांचे निर्देश

‘सेवानिवृत्त श्वानाला जिथे ठेवण्यात आले आहे, तेथे दत्तक घेणारी व्यक्ती आणि श्वान यांची भेट घडवण्यात येईल. श्वान प्रशिक्षकांनी त्यांना प्रशिक्षण दिलेले असल्याने ते घरी रुळू शकतील’, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. सीआरपीएफच्या पोर्टलवर या श्वानांची छायाचित्रे, थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. श्वानाच्या दत्तक प्रक्रियेच्या अटी व शर्तीमध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे की त्यांचा कोणत्याही प्रकारे दुरुपयोग केला जाणार नाही किंवा त्यांच्याकडून गैरवर्तन करून घेतले जाणार नाही. तसेच त्यांची विक्री करण्यात येणार नाही असेही यात म्हटले आहे.(CRPF)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.