कसारामध्ये अडकलेल्या रेल्वे प्रवाशांच्या मदतीला धावली एसटी!

मुसळधार पाऊस पडत असतानाही एसटी महामंडळाने तातडीने बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे सुमारे ५,८०० हून अधिक प्रवाशांना सुखरूप सोडण्यात आले.

116

मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे कामानिमित्त मुंबईत येणाऱ्या व नाशिकला जाणाऱ्या प्रवाशांच्या मदतीला एसटी धावून आली. कसारा, इगतपुरी येथे अडकलेल्या प्रवाशांसाठी एसटी महामंडळाने गुरुवारी पहाटे ४ वाजता तातडीने १३३ बसेस सोडल्या. या बसेसमधून सुमारे ५,८०० प्रवाशांना सुखरूप सोडले, अशी माहिती परिवहन मंत्री तथा ॲड. अनिल परब यांनी दिली.

(हेही वाचा : पुन्हा कसारा घाटात कोसळली दरड! ‘या’ लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द!)

५,८०० प्रवाशांना सुखरूप सोडवले!

मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प् झाल्याने हजारो प्रवाशांचा खोळंबा झाला. रेल्वे बंद पडल्याने हजारो प्रवाशी कसारा, इगतपूरी स्थानकात अडकून पडले होते. याची माहिती मिळताच रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांच्या सेवेकरीता एसटी महामंडळाने ठाणे (९३) व नाशिक (४०) विभागातून सुमारे १३३ बसेस उपलब्ध करून दिल्या. सदर वाहतूक गुरुवारी पहाटे ४ वाजल्यापासून सुरु करण्यात आली. मुसळधार पाऊस पडत असतानाही एसटी महामंडळाने तातडीने बसेस उपलब्ध करून दिल्यामुळे सुमारे ५,८०० हून अधिक प्रवाशांना सुखरूप सोडण्यात आले. त्यामुळे या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.

 (हेही वाचा : मशिदींवरील भोंग्यांविरूद्ध सिनेमागृहात घुमणार ‘आवाज ‘!)

पुणे-मुंबई मार्गावर ७४ जादा गाड्या सोडल्या!

पावसामुळे पुणे-मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बंद पडल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर करण्याकरीता एसटी महामंडळाने पुणे स्थानक येथून मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांसाठी ६५ जादा सोडल्या. तर मुंबईहून ९ बसेस सोडण्यात आल्या, अशी माहिती ॲड. अनिल परब यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.