- प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाला (BJP) सोडलेले काही महत्त्वाचे नेते परत येण्याची चिन्हे दिसत आहेत. तिकीट मिळवण्यासाठी भाजपा सोडून दुसऱ्या पक्षात गेलेल्या नेत्यांना आता भाजपामध्ये पुनरागमनाचा विचार सतावत आहे. यामुळे भाजपाच्या नेतृत्वापुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोकणातील एका प्रमुख नेत्याने नुकतीच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याची माहिती आहे. तसेच, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले संजय काका पाटील यांनी देखील भाजपामध्ये (BJP) परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपाने त्यांच्या परतण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसला तरी यामुळे पक्षात चर्चांना उधाण आले आहे.
(हेही वाचा – Mahavikas Aghadi मध्ये फाटाफूट; स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये एकत्र लढणार की नाही?)
याशिवाय, समरजीत घाडगे, हर्षवर्धन पाटील, बाळ माने आणि राजन तेली यांसारख्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. मात्र, सध्याच्या राजकीय समीकरणांमध्ये बदल झाल्याने हे नेते पुन्हा भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. भाजपाच्या (BJP) प्रदेश नेतृत्वाने अशा नेत्यांशी थेट संपर्क साधल्याची किंवा त्यांना पक्षात सामील करून घेण्याच्या बाबतीत काही ठोस भूमिका जाहीर केलेली नाही.
भाजपामधील (BJP) एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, “राजकीय पक्ष सोडून परत येणाऱ्या नेत्यांचा निर्णय हा पक्षाच्या फायद्याचा आणि त्यांच्या निष्ठेवर आधारित असतो. त्यामुळे या नेत्यांना पक्षात परत घ्यायचे की नाही, यावर लवकरच चर्चा होईल.” या हालचालींमुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाच्या पक्षांतर्गत राजकारणाला एक वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. आता भाजपाच्या नेतृत्वाचा यावर काय निर्णय होतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community