Sir Ratan Tata Trust : रतन टाटा यांच्या विश्वस्त मंडळात नोएल टाटांच्या मुलांच्या समावेशाने नवीन वाद

Sir Ratan Tata Trust : टाटा समुहात नवा कौटुंबिक कलह निर्माण होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

60
Sir Ratan Tata Trust : रतन टाटा यांच्या विश्वस्त मंडळात नोएल टाटांच्या मुलांच्या समावेशाने नवीन वाद
  • ऋजुता लुकतुके

यापूर्वी सायसर मिस्त्री टाटा समुहाचे अध्यक्ष असताना २०१६ मध्ये अध्यक्षपदावरून जोरदार वाद झाला होता आणि तो कोर्टातही गेला. आता रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांनी निर्माण केलेल्या सर रतन टाटा औद्योगिक संस्था विश्वस्त मंडळातही वाद सुरू होताना दिसत आहे. ही संस्था ही टाटा समुहातील दुसरी मोठी गुंतवणूकदार संस्था आहे. त्यामुळे हा वादही महत्त्वाचा मानला जातोय. रतन टाटा यांच्या सावत्र भाऊ आणि सध्याचे टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा यांच्या दोन मुली माया आणि लीह यांच्या विश्वस्त मंडळातील समावेशावरून हा वाद सुरू झाला आहे. (Sir Ratan Tata Trust)

त्यांना संचालक मंडळात सहभागी करून घेण्यासाठी अरनाझ कोतवाल आणि फ्रेडी तलाटी या दोघींना राजीनामा देण्यास सांगण्यात आलं आणि त्यांनी पत्र लिहून विश्वस्त मंडळाकडे आपली नाराजी व्यक्त केली आहे. सर रतन टाटा औद्योगिक संस्थेच्या संचालक मंडळातील हा बदल वादात सापडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आउटगोइंग ट्रस्टी अरनाज कोतवाल यांनी त्यांच्या सहकारी विश्वस्तांना लिहिलेल्या पत्रात या प्रक्रियेवर असंतोष व्यक्त केला आहे. (Sir Ratan Tata Trust)

(हेही वाचा – Mahavikas Aghadi मध्ये फाटाफूट; स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये एकत्र लढणार की नाही?)

नवीन विश्वस्त आणण्यासाठी ज्या पद्धतीने राजीनामा देण्यास सांगितले जात होते ते योग्य नसल्याचे ते म्हणाले. दुबईत राहणारे आणि व्हीएफएस ग्लोबलमध्ये काम करणाऱ्या कोतवाल यांनी लिहिले – मला दुःख आहे की तुमच्यापैकी कोणीही या विषयावर थेट बोलण्यासाठी माझ्याशी संपर्क साधला नाही. माया टाटा यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात टाटा कॅपिटलमधून केली, सध्या त्या टाटा डिजिटल अंतर्गत टाटा न्यू ॲप्सचे व्यवस्थापन करणाऱ्या टीमचा एक भाग आहेत. लेह टाटा इंडियन हॉटेल्सच्या उपाध्यक्ष आहेत आणि त्यांनी IE बिझनेस स्कूलमधून मार्केटिंगमध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे. (Sir Ratan Tata Trust)

रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल टाटा यांना ‘टाटा ट्रस्ट’चे नवे अध्यक्ष बनवण्यात आले. त्यावेळी ते आधीच दोन कौटुंबिक ट्रस्टचे विश्वस्त होते. नोएल हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. ९ ऑक्टोबर रोजी रतन टाटा यांच्या निधनानंतर नोएल हे एकमेव दावेदार होते. त्यांचे भाऊ जिमी यांचंही नाव चर्चेत असलं तरी ते आधीच निवृत्त झाले आहेत. मुंबईत झालेल्या विश्वस्त बैठकीत नोएल यांच्या नावावर एकमत झाले. टाटा ट्रस्टने अधिकृत निवेदनात म्हटले होते की, ‘त्यांची नियुक्ती तत्काळ प्रभावाने प्रभावी होईल.’ नोएल हे नवल टाटा यांचा त्यांची दुसरी पत्नी सिमोन यांचे सुपुत्र आहेत. रतन टाटा आणि जिमी टाटा ही नवल आणि त्यांची पहिली पत्नी सनी यांची मुले आहेत. (Sir Ratan Tata Trust)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.