- ऋजुता लुकतुके
पाकिस्तानची तयारी पूर्ण नसल्यामुळे अख्खीच्या अख्खी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा पाकिस्तानबाहेर हलवण्याची भीती व्यक्त होत असतानाच पाकिस्तान क्रिकेट मंडळाने फेब्रुवारीपर्यंत तीनही मैदानं तयार करण्याची हमी दिली आहे. ‘तीनही मैदानांवरील काम फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होईल आणि पाकिस्तानमध्येच चॅम्पियन्स करंडकाचं यशस्वी आयोजन होईल. काळजीची गरज नाही,’ असं पीसीबीचे पदाधिकारी आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. (Champions Trophy 2025)
अफवांना बळी पडू नका, असं या पदाधिकाऱ्याचं सांगणं होतं. पाकिस्तानने ही हमी दिली असली तरी आयसीसीने पर्यायी ठिकाण म्हणून दुबईची तयारी ठेवली असल्याचं समजतंय. पुढील आठवड्यात आयसीसीचं एक पथक पाकिस्तानमध्ये रावळपिंडी, कराची आणि लाहोर या तीन ठिकाणी मैदानांची पाहणी करणार आहे आणि तिथल्या कामाचा आढावाही घेणार आहे. त्यानंतरच खरी परिस्थिती उघड होईल. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – केंद्रीय बोर्डाच्या शाळांमध्येही घुमणार ‘जय जय महाराष्ट्र माझा’ चे सूर; Dada Bhuse यांची माहिती)
3 ماہ سے بھی کم عرصے میں قذافی سٹیڈیم کا رنگ و روپ بدل گیا
گرے سٹرکچر 100 فیصد مکمل۔ فنشنگ ورک تیز
پورا سٹیڈیم نیا۔ 34 ہزار سے زائد کی گنجائش
جدید لائٹس کی تنصیب آخری مرحلے میں۔ جنرل انکلوژرز سے بھی گراؤنڈ کا ویو بہتر ہو گیا
دونوں اطراف نئی سکور سکرینز نصب کرنے کاکام بھی… pic.twitter.com/msRYibfd2o
— PCB Media (@TheRealPCBMedia) January 6, 2025
‘पाकिस्तानची प्रतिमा खराब करण्यासाठी मैदानांचे खराब फोटो सोशल मीडियावर टाकले जात आहेत. हे कोण करतंय याची आम्हाला कल्पना आहे. पण, सध्या आम्ही कामावर लक्ष केंद्रीत केलं आहे आणि ही स्पर्धा यशस्वी करण्याचा आमचा निर्धार आहे,’ असं ट्विटमध्ये म्हटलं आहे. (Champions Trophy 2025)
१९ फेब्रुवारीला स्पर्धेचा पहिला सामना होणार आहे. आयसीसीच्या क्रमवारीतील अव्वल ८ संघांमध्ये १५ सामने खेळवले जाणार आहेत. पण, भारतीय संघाने पाकिस्तानला प्रवास करण्यासाठी नकार दिल्यामुळे भारताचे सर्व सामने हे दुबईत होणार आहेत. शिवाय भारतीय संघ बाद फेरीत पोहोचल्यास ते सामनेही दुबईत होतील. (Champions Trophy 2025)
पाकिस्तानमधील तीनही मैदानांचं सध्या नुतनीकरण सुरू आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये या कामाला सुरुवात झाली आणि डिसेंबर २०२४ मध्ये काम पूर्ण होईल असं आधी ठरलं होतं. पण, प्रत्यक्षात खेळाडूंच्या ड्रेसिंग रुम तयार नाहीएत. तसंच मुख्य खेळपट्टी आणि आऊटफिल्डचं कामही पूर्ण झालं नसल्यामुळे आयसीसीने नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तानमध्ये शेवटची आयसीसी स्पर्धा १९९६ मध्ये झाली होती. (Champions Trophy 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community