Uddhav Thackeray यांची नाराजांबद्दल ठाम भूमिका; ज्यांना जायचंय…

91
Uddhav Thackeray यांची नाराजांबद्दल ठाम भूमिका; ज्यांना जायचंय...
  • प्रतिनिधी

मुंबईतील आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आढावा बैठकीत पक्षातील काही जुन्या नगरसेवकांनी आपल्या नाराजीचा सूर उंचावला. या नाराज पदाधिकाऱ्यांना उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) ठाम भूमिका घेत “अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणं योग्य नाही. ज्यांना पक्ष सोडायचा आहे, त्यांनी खुशाल सोडावा,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.

या बैठकीत नगरसेवकांनी शिनसेना उबाठाच्या नेतृत्वावर नाराजी व्यक्त करत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकला. मातोश्रीवर होणाऱ्या पदाधिकारी आढावा बैठकीत माजी नगरसेवकांना बोलवले जात नसल्याची तक्रार करण्यात आली. तसेच विधानसभा निवडणुकीदरम्यान उमेदवारी निश्चित करताना माजी नगरसेवकांना विश्वासात घेतले गेले नाही, अशी नाराजी एका नगरसेवकाने जाहीर केली.

(हेही वाचा – सुप्रीम कोर्टाचा SBI ला दणका; म्हणाले, फसवणुकीची रक्कम देणे…)

अखंड शिवसेना असताना अशा प्रकारे उघड उघड नाराजी प्रकट करण्याची ताकद कोणत्याही पदाधिकाऱ्यांमध्ये याआधी कधीच नव्हती. विधानसभा निवडणुकीमध्ये शिनसेना उबाठाला मोठ्या प्रमाणात फटका बसला त्यानंतर पक्षाच्या धोरणांबद्दल उघडपणे नाराजी प्रकट करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये नाराजांपैकी अनेक जण शिवसेना तसेच भाजपाच्या संपर्कात आहेत. यापैकी अनेक जण भाजपाकडून उमेदवारी मिळवून निवडणुका लढवू देखील शकतात.

या तक्रारींवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कडक भूमिका घेत नाराजांना धीर देण्याऐवजी पक्षाच्या बांधिलकीवर भर दिला. त्यांनी म्हटले की, “पक्ष अडचणीत असताना निष्ठा दाखवण्याची गरज असते. जो संघर्ष करतो, तोच खरा शिवसैनिक आहे.” आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नाराजीचा पक्षाच्या तयारीवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. मात्र, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) घेतलेली ठाम भूमिका पक्षातील अस्वस्थतेवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आहे. आगामी निवडणुकीत ठाकरे गट कसा पुढे जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.