Karnataka तील काँग्रेस सरकारने आरोग्य योजनेचा लाभ नाकारला; पीडित रुग्णाने केली आत्महत्या

40
Karnataka तील काँग्रेस सरकारने रुग्णाला जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यास दिला नकार
Karnataka तील काँग्रेस सरकारने रुग्णाला जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यास दिला नकार

कर्नाटकातील काँग्रेस (Congress) सरकारने एका रुग्णाला रुग्णालयामध्ये सरकारी योजनेचा लाभ दिला असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे काँग्रेस (Congress) सरकारवर टीका केली जात आहे. बंगळुरुमधील एका रुग्णालयात आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेचा (Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana) लाभ देण्यास नकार देण्यात आल्याने रुग्ण योजनेपासून वंचित राहिला आहे. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय मानवाधिकार परिषदेने कर्नाटक सरकारकडे यासंदर्भातील अहवाल मागितला आहे. (Karnataka) दरम्यान या प्रकरणातील पीडित व्यक्तीने लाभ नाकारल्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

( हेही वाचा : Sir Ratan Tata Trust : रतन टाटा यांच्या विश्वस्त मंडळात नोएल टाटांच्या मुलांच्या समावेशाने नवीन वाद

वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना किडवाई मेमोरियल इन्स्टिट्यूट ऑफ ऑन्कोलॉजी (Kidwai Memorial Institute of Oncology) येथे घडली आहे. या रुग्णालयात कर्करोगावर उपाचार केले जातात. मात्र तिथे सरकारी योजनेपासून रुग्णाला वंचित ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्या रुग्णाला ५ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यासाठी नकार दिल्याने रुग्णाच्या मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. जेष्ठ नागरिकांना त्यांच्या कल्याणासाठी तयार करण्यात आलेल्या योजनांचा लाभ मिळत नसेल तर काँग्रेसचे हे धोरण लज्जास्पद असल्याची टीका आता होऊ लागली आहे. (Karnataka)

मानव हक्क आयोगाने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि कर्नाटक सरकारला या योजनेची अंमलबजावणी राज्य आणि इतर केंद्रशासित प्रदेशामध्ये कशी सुरू आहे याची विचारणा करण्यासाठी नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. आयुष्मान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनाचे उद्दिष्ट गरीब आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष आरोग्य सेवा प्रदान करणे आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना उपचारासाठी ५ लाखांपर्यंतचा खर्च केंद्र सरकार करते. मात्र कर्नाटकात काँग्रेस (Congress) सरकार असल्याने काही रुग्णालयांमध्ये केंद्र सरकारची आरोग्यासंबंधित असलेल्या योजनेचा लाभ रुग्णांना मिळत नसल्याचे बंगळुरूमधील घटना आहे.(Karnataka)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.