ग्राहकांच्या सर्वोत्तम सेवेत मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) जगात तिसऱ्या स्थानी आले आहे. विमानतळाला एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनलचे (Airports Council International) यासंबंधीचे मानांकन मिळाले आहे. हे मानांकन मिळविणारा हा देशातील एकमेव विमानतळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘एसीआय’ कडून ‘लेव्हल ५’ हे मानांकन मिळाले आहे. एसीआयच्या विमानतळ ग्राहक अनुभव मानांकन कार्यक्रमातील हे असते. (Mumbai Airport)
विमानतळाकडून (Airport) सातत्याने ग्राहकांकडून अभिप्राय मागवून त्याचे विश्लेषण केले जाते व त्याआधारे समस्या सोडविणे व सुधारणांसाठी आवश्यक खबरदारी घेतली जाते. यात विमानतळ सुरक्षेसाठी तैनात सीआयएसएफ, इमिग्रेशन, सीमा शुल्क यांची भूमिका महत्त्वाची असते.
(हेही वाचा – Champions Trophy 2025 : पाकिस्तानने दिली फेब्रुवारीपूर्वी मैदान तयार ठेवण्याची हमी)
छत्रपती शिवाजी महाराज ग्राहकसेवेतील एसीआय मानांकन आंतरराष्ट्रीय डेटा संचालित, विमानतळाने डिजिटल फर्स्ट, प्रवासी-केंद्रित दृष्टिकोनासह विविध सुधारणा केल्या आहेत. मोठ्या प्रमाणात विस्तारित करण्यात आलेल्या ‘डिजिटल गेटवे’ कार्यक्रमाचा यात समावेश आहे. आंतरराष्ट्रीय टर्मिनल प्रवेशद्वारावरील ई-गेट्सची संख्या २४वरून ६८ पर्यंत वाढवण्यात आली आहे, जी देशात सर्वाधिक आहे. याखेरीज ‘एव्हीओ’ अप हा आगळा डिजिटल उपक्रम आहे. या अपमुळे विमानतळ कार्यसंचालन, व्यवस्थापन व प्रवासी अनुभवामध्ये नवीन मापदंड विमानतळावर स्थापित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर विमानतळाला हे मानांकन मिळाल्याचे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (International Airport) लिमिटेडने म्हटले आहे. हे विमानतळ अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडकडून चालविले जाते.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community