येत्या काही महिन्यात नागपूर ते पुणे आणि नागपूर ते मुंबई दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) धावण्याची शक्यता आहे. यासंदर्भात एक प्रस्ताव मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने रेल्वे बोर्डाकडे सादर केल्याची माहिती नागपूरचे नवनियुक्त डीआरएम विनायक गर्ग यांनी दिली आहे.
(हेही वाचा – Mumbai Airport जगात ‘तिसऱ्या’ स्थानी)
सध्या नागपूर येथून नागपूर-सिकंदराबाद, नागपूर-इंदोर आणि नागपूर-भोपाळ अशा तीन वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) धावत आहेत. त्यात नव्या दोन वंदे भारत एक्सप्रेसची भर पडणार आहे. नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते पुणे या दोन्ही मार्गावर प्रवास करणऱ्यांची संख्या मोठी आहे.
(हेही वाचा – Karnataka तील काँग्रेस सरकारने आरोग्य योजनेचा लाभ नाकारला; पीडित रुग्णाने केली आत्महत्या)
मात्र, गाड्यांची संख्या मर्यादित असल्याने तीन महिन्यांपूर्वीच भली मोठी वेटिंग लिस्टसुद्धा तयार झालेली असल्याने गरजू प्रवाशांना आगाऊ पैसे खर्च करून खासगी बसचा पर्याय निवडावा लागत आहे. त्यामुळे यासंदर्भात गेल्या वर्षांपासून नागपूर ते मुंबई आणि नागपूर ते पुणे या दोन्ही मार्गावर नवीन गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्याने करण्यात येत होती. त्या अनुषंगाने मध्य रेल्वेच्या नागपूर मंडळाने रेल्वे बोर्डाच्या या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस (Vande Bharat Express) सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community