Murder : उपसचिवाच्या पत्नीकडून पोटच्या मुलाची हत्या; वांद्रे पूर्व येथील घटनेने उडाली खळबळ

144
Murder : उपसचिवाच्या पत्नीकडून पोटच्या मुलाची हत्या; वांद्रे पूर्व येथील घटनेने उडाली खळबळ
  • प्रतिनिधी 

आईने स्वतःच्या १० वर्षाच्या मुलाचा गळा वायरने आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबईतील वांद्रे पूर्व येथे समोर आली आहे. या प्रकरणी खेरवाडी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मुलाच्या हत्येप्रकरणी ३६ वर्षीय आईला अटक करण्यात आली आहे. पोटच्या मुलाची हत्या करणारी महिला ही ‘स्किझोफ्रेनिया’ या आजाराने ग्रस्त असल्याचा दावा करण्यात येत असून तिचे पती राज्य उत्पादन शुल्क विभागात उपसचिव या पदावर आहेत. सर्वेश औटे (१०) असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव असून अभिलाषा औटे (३६) असे अटक करण्यात आलेल्या आईचे नाव आहे. सर्वेश हा आई अभिलाषा, वडील रवींद्र दिगंबर औटे आणि मोठ्या बहिणीसोबत वांद्रे पूर्व शासकीय वसाहतीतीतील ८० क्रमांकाच्या इमारतीत वास्तव्यास होते. सर्वेशचे वडील रवींद्र दिगंबर औटे (४४) हे राज्य उत्पादन शुल्क विभागात उपसचिव आहेत. (Murder)

(हेही वाचा – Delhi Assembly Election : राजकीय पक्षांचे भविष्य स्थलांतरित मतदारांच्या हाती)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सायंकाळी पती रवींद्र दिगंबर यांच्यासोबत पत्नी अभिलाषाचा घरगुती कारणावरून वाद झाला होता. या वादातून अभिलाषा १० वर्षाच्या सर्वेशला घेऊन बेडरूममध्ये गेली आणि तिने मुलासह स्वतःला बेडरूममध्ये कोंडून घेतले आणि मुलगा सर्वेशचा गळा इलेक्ट्रिक वायरने आवळून त्याची हत्या केली. त्यानंतर तिने थेट खेरवाडी पोलीस ठाणे गाठले. खेरवाडी पोलिसांनी चौकशी केल्यानंतर पोलीस ठाण्यात आलेल्या महिलेने हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी अभिलाषा या मातेला ताब्यात घेऊन तिच्या घरी दाखल झाले. वडील रवींद्र हे सर्वेशला घेऊन रुग्णालय गाठले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी रुग्णालय गाठून मृतदेह ताब्यात घेऊन तो भाभा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी वडील रवींद्र दिगंबर औटे यांची फिर्याद दाखल करून अभिलाषा या आईवर मुलाच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे. तिच्या कुटुंबाने तिला ‘स्किझोफ्रेनिया’ असल्याचा संशय व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांनी तपासलेल्या प्राथमिक वैद्यकीय नोंदींमध्ये अशा आजाराचा कोणताही उल्लेख आढळून आला नाही. (Murder)

(हेही वाचा – Air Pollution रोखण्यासाठी डिझेल वाहने, लाकूड/कोळशाच्या भट्ट्या टप्प्याटप्प्याने बंद करा; मुंबई उच्च न्यायालयाचा प्रस्ताव)

पोलिसांच्या अहवालानुसार, आईने हे कृत्य करण्यापूर्वी स्वतःला आणि तिच्या मुलाला त्यांच्या बेडरूममध्ये कोंडून घेतले होते. त्यावेळी तिचा पती, जो सरकारी कर्मचारी होता आणि तिची किशोरवयीन मुलगी घरी होती. कुटुंबातील सदस्यांना मुलाला आढळून आले आणि त्यांनी पोलिसांना कळवले तेव्हा ही घटना उघडकीस आली. मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, “वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि तिच्या रेकॉर्डमध्ये ‘स्किझोफ्रेनिया’ किंवा संबंधित आजारांचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत. आरोपी सामान्यतः अटक टाळण्यासाठी अशा प्रकारचे बचावात्मक आरोप करतात. तपासात सर्व काही उघड होईल. सध्या, आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल. पुढील वैद्यकीय अहवालानंतर तिला खरोखरच ‘स्किझोफ्रेनिया’ ने ग्रस्त आहे की नाही हे ठरवतील.” जर आजाराची पुष्टी झाली तर न्यायालय तिच्या सुटकेचा निर्णय घेईल आणि नंतर आरोपपत्र दाखल केले जाईल असे अधिकारी म्हणाले. (Murder)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.