महाकुंभ हा दर १२ वर्षांनंतर भारतात भरवला जातो. महाकुंभमेळा सनातन हिंदू (Hindu) धर्माचा जीव असल्याचे बोलले जाते. हजारो संत महंत या कुंभमेळ्यात सहभागी होतात. अशातच आता २०२५ मधील महाकुंभमेळ्यात एका चिमुरड्या बालकानेही सहभाग घेतला आहे. (Mahakumbh)
( हेही वाचा : BEST : बेस्टच्या महाव्यवस्थापकपदाची खुर्ची नको कुणाला; अधिकारी टिकत नाही वर्षांपेक्षा जास्त काळ!)
वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, एका छायाचित्रात लहान मुलगा कपाळावर भस्म आणि भगवे कपडे परिधान करून बसलेला पाहायला मिळतो. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या चिमुरड्याचे नाव हे श्रवण पुरी असून त्याचे वय हे अवघे साडे तीन वर्षे आहे. जुन्या आखाड्याने या चिमुरड्याला संत पदाचा दर्जा बहाल केला आहे. श्रवण पुरी हा जुन्या आखाड्यात सहभागी होतो. आपल्या बोबडया बोलामध्ये तो श्लोक मंत्र बोलत असतो. साधारणत: लहान मुले ही चॉकलेट खाण्याचा हट्ट करतात. मात्र, श्रवण पुरी (Shravan Puri)हा फळे खातो.(Mahakumbh)
श्रवण पुरीला (Shravan Puri) हरियाणाच्या फतेहबादमध्ये एका दाम्पत्याने आश्रमामध्ये दान केले होते. तेव्हा ते बालक अवघ्या तीन महिन्यांचे होते. तेव्हापासून आश्रमात असणाऱ्या संबंधितांनी त्याची काळजी घेतली होती. त्यांच्यावर संस्कार केले होते. दम्पत्याचा नवस पूर्ण झाल्याने दाम्पत्यांनी त्याला दान केले असे सांगण्यात येत आहे. त्याचे वय पाहता तो अगदी कमी वयातील संत असल्याचे बोलले जात आहे. त्याला पाहिल्याने अनेकजण थक्क झाले आहेत. चिमुरडा बालक संत कसा काय हे पाहून लोकांना आश्चर्य वाटते.(Mahakumbh)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community