सगळ्यात मोठे vihar lake कुठे आहे माहित आहे का?

29
सगळ्यात मोठे vihar lake कुठे आहे माहित आहे का?

विहार तलाव (vihar lake) हा मिठी नदीजवळच्या विहार नावाच्या गावात, बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात आहे. हे तलाव १८६० साली बांधलं गेलं होतं. ते बेटांच्या सॅलसेट गटातलं मुंबईमधलं सर्वात मोठं तलाव मानलं गेलं. विहार लेक हे तुळशी तलाव आणि पवई तलाव यांनी वेढलेलं आहे. विहार तलावापासून मुंबई विभागाच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा काही अंशी भागवल्या जातात. भांडुप येथे पाणी फिल्टर केल्यानंतर मुंबई शहराच्या पाण्याच्या गरजेपैकी ३% पाणी विहार लेक पुरवते.

विहार लेकपर्यंत (vihar lake) जायचं असल्यास रस्त्याने जाण्यासाठी मुंबईपासून ३१ किलोमीटर एवढं अंतर पार करावं लागतं. तसंच मेट्रो ट्रेनने जायचं असेल तर कुर्ला किंवा अंधेरी या स्थानकांवरून रस्त्याने इथपर्यंत पोहोचता येतं. १२ मार्च १९९३ साली मुंबईत बॉम्बस्फोट झाल्यामुळे १३ मार्च १९९३ सालापासून सामान्य लोकांसाठी विहार लेक इथला प्रवेश बंद करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Balasaheb Thackeray यांच्या स्मारकाचे श्रेय कुणाचे? उद्धव ठाकरे म्हणाले, उद्घाटन करेल त्या…)

विहार तलाव (vihar lake) तयार करण्यासाठी १८.९६ किलोमीटर वर्ग एवढ्या पाणलोट क्षेत्रातून पावसाचं पाणी साठवण्यासाठी मुंबईच्या उत्तरेला २० किलोमीटरच्या क्षेत्रावर मिठी नदीचं पाणी अडवण्यात आलं होतं. पवई-कान्हेरीच्या डोंगररांगा पाणलोट क्षेत्र तयार करतात. या डोंगररांगांवरून पावसाचं पाणी तलावात वाहून नेलं जातं. ८०.४२ मीटर एवढा आणि ९२०० दशलक्ष गॅलन क्षमतेचा जलाशय तयार करण्यासाठी दगडी स्पिलवेसोबतच तीन मातीचे बंधारे बांधण्यात आले होते.

विहार तलावाची (vihar lake) कमाल पाण्याची खोली ३४ मीटर आणि किमान पाण्याची खोली १२ मीटर एवढी आहे. तसंच या तलावाचं क्षेत्रफळ ७ किलोमीटर वर्ग एवढं आहे. १८७२ साली धरणाची उंची वाढवण्यात आली होती. त्यामुळे पाणीपुरवठा ३२ दशलक्ष गॅलनवरून ३६ दशलक्ष गॅलनपर्यंत वाढला.

(हेही वाचा – Murder : उपसचिवाच्या पत्नीकडून पोटच्या मुलाची हत्या; वांद्रे पूर्व येथील घटनेने उडाली खळबळ)

विहार तलाव (vihar lake) आणि त्याचे पाणलोट बृहन्मुंबई महानगरपालिका आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान प्राधिकरणाद्वारे संरक्षित केलेले आहे. विहार तलावाच्या पाणलोट क्षेत्रात चारही बाजूंनी उंच टेकड्या आहेत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानांतर्गत प्रदान करण्यात आलेलं मेंटेनन्स तसंच सुरक्षा यामुळे उत्तम वृक्षाच्छादित असलेला डोंगर उतार आणि मुबलक नैसर्गिक पुनरुत्पादनाची खात्री पक्की झाली आहे. विहार तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झाडांच्या खैर प्रजातींची उच्च टक्केवारी नोंदवण्यात आली आहे.

विहार तलाव (vihar lake) संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आत वसलेला असल्याने उद्यानासाठी नोंदवलेले वनस्पती आणि प्राणी या विहार लेकशी संबंधित आहेत. विहार तलावात मगरींचा वावर मोठ्या संख्येने पाहायला मिळतो. तलावात त्यांना सहज पाहणे शक्य नसल्याने राष्ट्रीय उद्यानाने मगर उद्यानाची स्थापना केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.