-
ऋजुता लुकतुके
डीपीएससी ही कंपनी २०१३ मध्येच इंडियन पॉवर कॉर्पोरेशन या कंपनीत विलीन झाली आहे. पॉवर कॉर्पोरेशन ही देशातील १९१९ मध्ये सुरू झालेली सगळ्यात जुनी पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी आहे. कोलकाता इथं कंपनीचं मुख्यालय आहे. आणि तिथेच कंपनीचा ७९८ वर्ग किलोमीटर परिसराला ही कंपनी ऊर्जा वितरण करते. कंपनीची ऊर्जा निर्मिती क्षमता ५० मेगावॅटची आहे. आणि यातील ३५ मेगावॅट गुजरात व कर्नाटकमधील पवनऊर्जा प्रकल्पातून येतात. त्याव्यतिरिक्त कंपनीचे पश्चिम बंगाल इथं सौर आणि औष्णिक ऊर्जा प्रकल्पही आहेत. (DPSC Share Price)
(हेही वाचा- MSRTC Bus: वर्षाच्या सुरुवातीला प्रवाशांसाठी गुड न्यूज! आता घरबसल्या कळणार ‘लालपरी’चे लोकेशन)
ऊर्जा वितरण हे कंपनीचं मुख्य काम आहे. आणि त्यासाठी ग्रिडचं डिजिटायझेशन कंपनीने मोठ्या प्रमाणावर हाती घेतलं आहे. त्यामुळे कंपनी येत्या काही दिवसांत पूर्णपणे आधुनिक होणार आहे. कंपनीचा सध्याचा एकूण महसूल हा १७१ कोटी रुपयांचा आहे. पण, मिळणारे पैसे कंपनी ज्या पद्धतीने वापरते, याबद्दल तज्जांना साशंकता असल्यामुळे कंपनीची शेअर बाजारातील कामगिरी तितकी प्रभावी ठरलेली नाही. (DPSC Share Price)
गेल्यावर्षीच्या शेवटच्या तिमाहीत कंपनीने १८ टक्के परतावा गुंतवणूकदारांना दिला आहे. कंपनी आपल्याकडे असलेलं भांडवल किती प्रभावीपणे वापरतं यावर कंपनीची कामगिरी अवलंबून असते. आणि गुंतवणूकदारालाही त्यावर किती नफा मिळणार हे ठरतं. त्यामुळे रिटर्न ऑन इक्विटी हा शेअर निवडताना गुंतणूकदारांसाठी एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो. त्यामुळे इंडिया पॉवर कॉर्पोरेशनचा रिटर्न ऑन इक्विटी सध्या १.७ टक्के इतका आहे. (DPSC Share Price)
(हेही वाचा- इस्कॉननंतर आता Maha Kumbh Mela 2025 मध्ये अदाणी समूह गीता प्रेससह सनातन साहित्याचे मोफत वाटप करणार)
त्याचवेळी ऊर्जा क्षेत्राची वाढ झाली आहे त्या प्रमाणात या कंपनीची वाढ झालेली दिसत नाही. म्हणजे आर्थिक वर्ष २०२५ मध्ये ऊर्जा क्षेत्राचा सध्या २.६ टक्क्यांनी विकास झाला आहे. तर इंडिया पॉवर कंपनीची वाढ उणे ४.६ टक्के अशी आहे. कंपनी सध्या आपल्या नफ्यातील ६९ टक्के नफा आपल्याकडे कायम ठेवत आहे. पण, या पैशाचा वापर चांगल्या पद्धतीने होताना दिसत नाही, असा जाणकारांचा होरा आहे. कारण, गुंतवणुकदारांना तसा परतावा मिळालेला नाही. (DPSC Share Price)
(टिप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जबाबदारीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी – विक्रीवर सल्ला देत नाही)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community