स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी BJP सज्ज, ‘महाविजेता’ अभियानास उद्यापासून सुरुवात

32
स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी BJP सज्ज, ‘महाविजेता’ अभियानास उद्यापासून सुरुवात
स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी BJP सज्ज, ‘महाविजेता’ अभियानास उद्यापासून सुरुवात

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने (भाजपा) रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. पक्षाच्या ‘०.३ महाविजेता’ अभियानाची सुरुवात उद्या शिर्डीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाने सर्व जिल्हाध्यक्ष, आमदार, मंत्री आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. (BJP)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून, यामध्ये निवडणुकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. भाजपाने या मोहिमेचा उद्देश स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वर्चस्व मिळवून राज्याच्या विकासाला चालना देणे असा ठरवला आहे. प्रत्येक जिल्हा आणि प्रभाग पातळीवर रणनीती तयार करून मतदारांशी थेट संवाद साधण्यावर या अभियानात भर दिला जाणार आहे. (BJP)

(हेही वाचा- Cardiac Arrest : कर्नाटकनंतर गुजरातमध्येही आठ वर्षांच्या दोन विद्यार्थिनींचा शाळेतच हार्टअटॅकने मृत्यू)

बैठकीत भाजपा प्रदेशाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, तसेच इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहतील. या बैठकीद्वारे निवडणुकीसाठी आवश्यक कार्यपद्धती, प्रचार मोहिमेची दिशा आणि कामाचे नियोजन यावर चर्चा होईल. जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांना विशिष्ट जबाबदाऱ्या सोपवून त्यांच्या कार्यक्षमता वाढवण्यावरही भर दिला जाईल. (BJP)

‘महाविजेता’ अभियानाद्वारे भाजपा राज्यातील मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये विकासकामे, सरकारच्या योजना, तसेच पक्षाचा मतदारांशी असलेला थेट संवाद अधोरेखित केला जाणार आहे. (BJP)

स्थानिक स्वराज्य निवडणुकांमधील विजय भाजपासाठी केवळ सत्ता स्थापन करण्याचे नव्हे, तर राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपाच्या मोहिमेची व्याप्ती अधिक वाढवली जाईल, अशी शक्यता आहे. (BJP)

(हेही वाचा- Sanjay Shirsat : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता, शिरसाटांचा खळबळजनक दावा)

भाजपाने राज्यात प्रभावीपणे आपली भूमिका बजावली असून, स्थानिक स्वराज्य निवडणुकांद्वारे या यशाला अधिक बळकटी देण्याचा पक्षाचा मानस आहे. (BJP)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.