maa kamakhya temple : शिवसैनिकांना अभय देणार्‍या कामाख्या माता मंदिराचा अद्भुत इतिहास आणि परंपरा!

35
maa kamakhya temple : शिवसैनिकांना अभय देणार्‍या कामाख्या माता मंदिराचा अद्भुत इतिहास आणि परंपरा!

आसामची राजधानी गुवाहाटी इथे नीलांचल पर्वतावर कामाख्या माता मंदिर आहे. हे मंदिर भारतातल्या सर्वांत प्रसिद्ध शक्तीपीठांपैकी एक आहे. कामाख्या माता मंदिर हे पृथ्वीवरच्या ५१ शक्तीपीठांपैकी सर्वात पवित्र आणि सर्वात जुनं शक्तीपीठ आहे. तंत्र-मंत्र प्रक्रियेत या मंदिराचं एक वेगळं महत्त्व आहे. या मंदिरात वर्षभर साधू आणि तांत्रिक येत असतात.

कामाख्या मंदिराच्या आवारात भुवनेश्वरी, काली, तारा, छिन्नमस्ता, बगलामुखी, भैरवी, धूमावती, मातंगी आणि कमला या सर्व देवींची मंदिरेही आहेत. कामाख्या देवीसह या सर्व देवींना दशमहाविद्या म्हणून ओळखलं जातं. शक्ती मंदिरांव्यतिरिक्त निलांचल पर्वतावर पाच शिवमंदिर आहेत. कामेश्वर, सिद्धेश्वर, अमृतोकेश्वर, अघोर आणि कौटिलिंग ही त्या पाच शिवमंदिरांची नावं आहेत. कामाख्या माता मंदिरात देवीची मूर्ती किंवा प्रतिमा नाही. इथे गाभाऱ्याच्या एका कोपऱ्यात एक शिळा उभी आहे. त्या शिळेवर योनीचं प्रतीक आहे. या योनीची पूजा देवी कामाख्या म्हणून केली जाते. (maa kamakhya temple)

(हेही वाचा – Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनी विविध क्षेत्रांतील १० हजार विशेष अतिथी दिल्लीत उपस्थित राहणार)

कामाख्या माता मंदिराचा इतिहास

प्रजापती दक्ष यांची मुलगी सतीने आपल्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध भगवान महादेवांशी लग्न केलं होतं. त्यामुळे प्रजापती सतीवर नाराज होते. एक दिवस प्रजापतींनी एक मोठा यज्ञ आयोजित केला होता. त्या यज्ञासाठी त्यांनी आपली मुलगी सती आणि जावई भगवान महादेव यांना सोडून सर्व देवतांना आमंत्रित केलं होतं. पण ‘वडिलांच्या घरी जायला आमंत्रण कशाला हवं’ असा विचार करून देवी सती, महादेवांनी नकार देऊनही त्यांचं न ऐकता यज्ञात सहभागी होण्यासाठी गेली.

तिथे प्रजापती दक्ष यांनी तिचा आणि महादेवांचा भयंकर अपमान केला. तो अपमान माता सतीला अजिबात सहन झाला नाही. तेव्हा सती मातेने त्याच यज्ञाच्या अग्नीने स्वतःला भस्मसात करून टाकलं. त्यामुळे महादेव दुःखावेगाने आता मातेचं जळलेलं शरीर घेऊन तिन्ही लोकांत भटकू लागले. ते संसारापासून विरक्त झाले होते. महादेव विरक्त झाल्यामुळे पृथ्वीचा समतोल ढासळू लागला होता. तेव्हा पृथ्वीला विनाशापासून वाचवण्यासाठी ब्रह्मदेवांसोबत इतर देवता आणि ऋषिगण भगवान श्रीहरी विष्णूंकडे गेले. (maa kamakhya temple)

महादेवांना विरक्त अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी भगवान श्रीहरी विष्णूंनी आपलं सुदर्शन चक्र पाठवून, त्याकरवी माता सतीच्या शरीराचे तुकडे केले. सती मातेच्या शरीराचे तुकडे जिथे जिथे पडले ते-ते स्थळ शक्तीपीठ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. गुवाहाटी इथल्या पर्वतावर सतीमातेचा योनिभाग पडला होता. ज्यावेळी असं घडलं त्यावेळी तो पर्वत निळा झाला. तेव्हापासून त्या पर्वताला निलांचल पर्वत म्हणून ओळखलं जाऊ लागलं आणि हे स्थान कामाख्या शक्तीपीठ म्हणून प्रसिद्ध झालं.

(हेही वाचा – Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जानेवारीत १५०० मिळणार की २१०० ? वाचा सविस्तर …)

कामाख्या माता मंदिराचा अंबुबाची उत्सव

हा उत्सव भारतातल्या अद्वितीय उत्सवांपैकी एक आहे. हा उत्सव चार दिवसांचा असतो. हा उत्सव कामाख्या माता मंदिराचा सर्वात महत्त्वाचा उत्सव आहे. या उत्सवाला पृथ्वीमातेचं वार्षिक मासिक पाळी चक्र मानलं जातं. अंबुबाची उत्सवादरम्यान अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या बंधनांचा अवलंब करून सहभागी होतात. या मंदिरात स्त्री प्रजनन ऊर्जाशक्ती आणि प्रजननक्षमतेच्या नैसर्गिक शक्तींचा उत्सव साजरा केला जातो.

देशभरातून भाविक भक्त प्रजननक्षमता वाढवण्यासाठी या कामाख्या मंदिरात देवीची उपासना करण्यासाठी येतात. अंबुबाची उत्सवादरम्यान या मंदिराचे दरवाजे चार दिवसांसाठी बंद केले जातात. या चार दिवसांत कोणीही मंदिरात प्रवेश करत नाहीत. या उत्सवात भाविक भक्त रात्रभर देवीची स्तुती गातात. त्यामुळे कामाख्या मातेला तिच्या एकांतवासातही भक्तांचा सहवास मिळतो. साधू आणि संत मंदिराबाहेर जप करत बसतात. (maa kamakhya temple)

या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मूर्ती नाही. योनीच्या आकाराच्या शिळेच्या स्वरूपात कामाख्या मातेची पूजा केली जाते. या उत्सवादरम्यान इथे येणारे पर्यटक तंत्रविधी विधी पाहू शकतात. कारण या उत्सवादरम्यान काही तांत्रिक त्यांच्या मानसिक क्षमतांचं प्रदर्शन करतात. हे तांत्रिक फक्त या उत्सवादरम्यानच सार्वजनिक ठिकाणी दिसतात. उर्वरित संपूर्ण वर्ष ते एकांतात घालवतात. म्हणूनच कामाख्या माता मंदिरातला हा अंबुबाची उत्सव हा अद्वितीय मानला जातो.

चार दिवसांनी मंदिराचे दरवाजे पुन्हा उघडल्यानंतर भाविकांना आणि पर्यटकांना जो प्रसाद वाटला जातो तो अंगोदक आणि अंगवस्त्र या दोन स्वरूपात असतो. अंगोदक म्हणजे झऱ्याचे पाणी आणि अंगवस्त्र म्हणजे लाल कापडाचा एक छोटासा तुकडा होय. एक मोठा कापड पृथ्वी मातेच्या वार्षिक पाळीच्या दिवसांत योनी झाकण्यासाठी वापरला जातो. मंदिर उघडल्यानंतर प्रत्येक भक्ताला या कापडाचा एक छोटा तुकडा प्रसाद म्हणून वाटला जातो. (maa kamakhya temple)

(हेही वाचा – Ram Mandir Ayodhya: रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची वर्षपूर्ती; असं असेल ‘या’ तीन दिवसीय सोहळ्याचे नियोजन)

कामाख्या माता मंदिराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ कोणता?

कामाख्या माता मंदिराला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ हा जून-जुलै महिन्यात आहे. अंबुबाची उत्सव हा महत्वाच्या वार्षिक उत्सवांपैकी एक आहे. हा उत्सवही याच काळात साजरा केला जातो.

एकनाथ शिंदे यांनी उठाव केल्यानंतर ते शिवसैनिकांना घेऊना याच कामाख्या मंदिरात दर्शनाला गेले होते आणि असं म्हणतात की मातेने त्यांना अभय दिला. (maa kamakhya temple)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.