पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जेरेधाचे सहसंस्थापक निखिल कामत यांच्या पॉडकास्टमध्ये (podcast) जुन्या आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान यांनी यावेळी त्यांचे मित्र आणि शिक्षकांबद्दलच्या आठवणी देखील सांगितल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथमच एका पॉडकास्टला मुलाखत दिली आहे. त्यांनी झेरोधाचे (Zerodha) सह-संस्थापक नितीन कामथ (Nitin Kamath) यांच्याशी त्यांच्या पीपल बाय डब्ल्यूटीएफ (People by WTF) या यूट्यूब चॅनलवर चर्चा केली. दोन तासांहून अधिक काळ चाललेल्या या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) त्यांच्या आयुष्यातील विविध पैलूंवर चर्चा केली.
(हेही वाचा – शेतकरी कर्जमाफीवरून वाद; Ajit Pawar आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक)
“I’m not a VIP. I’m a common man. I’ll visit Godhra in a single-engine helicopter, even if it’s risky…”
PM Modi narrates incidents from his life and journey, explaining how he manages stress, anxiety and other such mental challenges. pic.twitter.com/dtLnhL3TGi
— BJP Delhi (@BJP4Delhi) January 10, 2025
मी म्हणालो होतो की. मी कठोर परिश्रम करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही. मी माझ्यासाठी काहीही करणार नाही. मी माणूस आहे, माझ्याकडून चुका होऊ शकतात. मी वाईट हेतूने चुकीचे काम करणार नाही. मी हा माझ्या आयुष्याचा मंत्र बनवला. चुका होतात… मी देखील एक माणूस आहे, देव नाही. मी एक माणूस आहे म्हणून माझ्याकडून चुका होऊ शकतात…पण वाईट हेतूने मी काहीही चुकीचे करणार नाही, असे एक भाषण त्यांनी गुजरातचे मुख्यमंत्री असतांना केले होते. त्याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये करून दिली.
पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर हा पॉडकास्ट शेअर केला आणि त्याला ‘आनंददायी संभाषण’ म्हटले आहे. या वेळी त्यांनी बालपणीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, जर मी शिक्षक झालो असतो, तर माझ्या आईला खूप आनंद झाला असता. जर असे झाले असते, तर माझ्या आईने संपूर्ण गावात गूळ वाटला असता. मी कधीच विचार केला नव्हता की, मी इथपर्यंत पोहोचेन. मी कधी पंतप्रधान होईन, असे मला वाटले नव्हते. मी कधीही राजकारणात असे विचार करून आलो नाही की, मी काही उंच गाठेन. या जीवनातील जबाबदाऱ्या आहेत ज्या मला पूर्ण करायच्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community