-
ऋजुता लुकतुके
ओसवाल ग्रीनटेक ही देशातील बँकेतर वित्तीय संस्थांमधील एक स्मॉलकॅप कंपनी आहे. अलीकडच्या उतार चढावांनी भरलेल्या शेअर बाजारात कंपनीसाठी नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली. एकूण बँकांच्या शेअरना जानेवारी २०२५ च्या पहिल्या आठवड्यात चांगली मागणी होती. या कालावधीत एकट्या ७ जानेवारी २०२५ या दिवशी ओस्वाल ग्रीनटेक कंपनीने ७.५० टक्क्यांची उसळी शेअर बाजारात घेतली आणि दिवसभरात कंपनीने ४९ अंशांचा उच्चांकही नोंदवला होता. पण, शुक्रवारी शेअर बाजार बंद होईपर्यंत शेअरमध्ये पुन्हा ४ टक्क्यांची घसरण झाली होती. शुक्रवारी हा शेअर ४६.८३ वर बंद झाला आहे आणि एका महिन्याची शेअरची कामगिरी पाहिली तरी त्यात १२ टक्क्यांची घसरण दिसून येते. (Oswal Greentech Share Price)
त्यावरून या क्षेत्रातील मोठे उतार-चढाव आपल्याला समजतात. ओसवाल ग्रीनटेकने महिनाभरात दिवसभराच्या किमतीत ५ टक्के इतकी उतार चढावांची कक्षा दाखवली आहे. (Oswal Greentech Share Price)
(हेही वाचा – BJP Convention: शिर्डीत होणार भाजपाचे राज्यस्तरीय अधिवेशन; या बैठकीत अमित शाहांसह २२ हजार पदाधिकारी उपस्थित राहणार)
५ दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजपेक्षा हा शेअर सध्या वर आहे. अभय ओसवाल यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेली ही कंपनी मुख्यत्वे पायाभूत सुविधा उभारणी प्रकल्पांसाठी कर्ज देते. नवी दिल्लीत कंपनीचं कार्यालय असून नोंदणीकृत कार्यालय हे पंजाबमध्ये लुधियाना इथं आहे. कंपनीचं एकूण भांगभांडवल १.२५ हजार कोटी रुपयांचं आहे. तर कंपनीने ५२ आठवड्यातील उच्चांक ६८.९० इतका नोंदवला आहे. तर नीच्चांक २७.७५ इतका आहे. (Oswal Greentech Share Price)
ताज्या तिमाही आकड्यांनुसार, कंपनीच्या निव्वळ विक्रीत गेल्यावर्षीच्या तुलनेत ३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसंच करानंतरचा नफाही २२१ टक्क्यांनी वाढला आहे. या बातमीमुळेच कंपनीच्या शेअरमध्ये उसळी दिसली. पण, त्यानंतरही शेअरचं मूल्यांकन अवाजवी असल्याचं जाणकारांनी म्हटलं आहे. (Oswal Greentech Share Price)