- ऋजुता लुकतुके
चॅम्पियन्स करंडकासाठी पाकिस्तानची तयारी तपासून पाहण्यासाठी आयसीसीचं पथक पाकिस्तानमध्ये दाखल झालं आहे. लाहोरमध्ये पाक क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना गद्दाफी स्टेडिअम फिरून दाखवलं. याआधीच स्टेडिअमचं नुतनीकरण पूर्ण होणं गरजेचं होतं. पण, पीसीबीने ती मुदत आता २५ जानेवारीपर्यंत वाढवली आहे. चॅम्पियन्स करंडकाचे सामने १९ फेब्रुवारीपासून पाकिस्तानच्या लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथे होणार आहेत. अशा परिस्थितीत यजमान गद्दाफी स्टेडियमचे नूतनीकरण करत आहे. (Champions Trophy 2025)
पीसीबीने एक दिवस अगोदर ८ जानेवारी रोजी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेसोबत होणाऱ्या तिरंगी मालिकेचे ठिकाण बदलले होते. ४ सामन्यांच्या मालिकेतील सामने आधी मुलतानमध्ये खेळले जाणार होते, परंतु आता सामने लाहोर आणि कराचीमध्ये खेळवले जातील. तिरंगी मालिका ८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तोपर्यंत स्टेडिअम पूर्ण होईल अशी पाकिस्तानला खात्री आहे आणि तयारी जगाला दाखवण्यासाठीच त्यांनी हे पाऊल उचललं आहे. (Champions Trophy 2025)
(हेही वाचा – Republic Day 2025: प्रजासत्ताक दिनी विविध क्षेत्रांतील १० हजार विशेष अतिथी दिल्लीत उपस्थित राहणार)
पीसीबीने एक स्टेटमेंट दिले होते – लाहोरचे गद्दाफी स्टेडियम आणि कराचीच्या नॅशनल क्रिकेट स्टेडियमचे नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. त्यामुळेच बोर्डाने दोन्ही ठिकाणांना एकदिवसीय तिरंगी मालिका आयोजित करण्याची परवानगी दिली. यापूर्वी न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यातील मालिका मुलतानमध्ये होणार होती. (Champions Trophy 2025)
पीसीबीने गेल्यावर्षी ऑगस्टपासून आपल्या दोन स्टेडियमचे नूतनीकरण सुरू केले आहे. नूतनीकरणाचे काम ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करायचे होते. जे अद्याप पूर्ण झालेले नाही.पण, ते अजून झालेलं नाही. त्यामुळेच चॅम्पियन्स करंडक पाकिस्तानमधून हलवण्याची तयारी आयसीसीने ठेवली आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत तीनही स्टेडिअम तयार नसतील तर संपूर्ण स्पर्धा दुबईला हलवली जाऊ शकते. (Champions Trophy 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community