Delhi Assembly Elections : आप आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण

44
Delhi Assembly Elections : आप आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण
  • प्रतिनिधी

दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे कडाक्याची थंडी असताना देखील राजधानीचा पारा चांगलाच तापला आहे. निवडणूक जवळ येत असताना, आरोप-प्रत्यारोपांचे राजकारणही शिगेला पोहोचले आहे. भाजपा आणि आम आदमी पक्ष पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. गुरुवारी अरविंद केजरीवाल हे पूर्वांचलच्या लोकांच्या बनावट मतांबद्दल बोलले होते. आता दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी यावरून केजरीवालांवर हल्लाबोल केला आहे. (Delhi Assembly Elections)

(हेही वाचा – ‘माझ्याकडूनही चूका होतात…’, PM Narendra Modi प्रथमच दिसणार पॉडकास्टवर)

ते म्हणतात की, अरविंद केजरीवाल ज्या पद्धतीने दिल्लीची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. ती लाजिरवाणी बाब आहे. वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, केजरीवाल हवे तर मला शिवीगाळ करू शकतात; पण माझ्या दिल्लीला जातींमध्ये विभागू नका. केजरीवाल यांनी हे पहिल्यांदाच केलेले नाही. आम आदमी पक्षाने अमित शाहांबद्दल प्रसिद्ध केलेले पोस्टरही असेच आक्षेपार्ह आहे. त्यावरून तुम्ही किती खालच्या पातळीवर गेला आहात, हे दिसून येते. मात्र या आरोपांना उत्तर देताना संजय सिंह म्हणाले, त्यांनी काय चूक केली ?, हेच मला कळत नाही. तर दुसरीकडे मालीवाल प्रकरणावरूनही सचदेवा यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. (Delhi Assembly Elections)

(हेही वाचा – शेतकरी कर्जमाफीवरून वाद; Ajit Pawar आणि संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक)

केजरीवाल काहीही चुकीचे बोलले नाहीत

पूर्वांचलमधील मतदारांचा अपमान केल्याच्या आरोपांवर आप खासदार संजय सिंह यांनी केजरीवाल यांना पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, ३०-४० वर्षांपासून दिल्लीत राहणाऱ्या पूर्वांचलमधील बांधवांची मते कापली जाऊ नयेत, अशी तक्रार करण्यासाठी ते निवडणूक आयोगाकडे गेले होते. (Delhi Assembly Elections)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.