- प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यामागचे कारण स्पष्ट करत खळबळजनक विधान केले आहे. त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर भाष्य करत या निर्णयामागचे राजकारण उघड केले आहे.
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्यामागे मोठे कारण म्हणजे त्यांच्यावरचा दबाव. त्यांनी स्वतःहून हा निर्णय घेतलेला नाही, तर काही नेत्यांच्या दबावामुळे ते महाविकास आघाडीत राहू शकले नाहीत. या दबावामागे आदित्य ठाकरेंची भूमिका मोठी असल्याचे दिसते. आदित्य यांना स्वबळावर राजकारण करण्याची इच्छा होती, ज्यामुळे उद्धव ठाकरेंना आघाडीतून बाहेर पडावे लागले.”
(हेही वाचा – Dyanradha Multistate Fraud प्रकरणी ED ने सुरेश कुटेची 1433 कोटीं संपत्ती घेतली ताब्यात)
स्वबळावर लढण्याचा मुद्दा महत्त्वाचा
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उद्धव ठाकरे गटाने महापालिका निवडणुकांमध्ये स्वबळाचा नारा दिल्याबाबतही भाष्य केले. “महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासाठी उबाठाने हा निर्णय घेतला आहे. हे सर्व काही पूर्वनियोजित असून, आदित्य ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याचा आग्रह धरल्यामुळे उद्धव ठाकरेंना हा कठोर निर्णय घ्यावा लागला,” असे आंबेडकर म्हणाले.
(हेही वाचा – Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जानेवारीत १५०० मिळणार की २१०० ? वाचा सविस्तर …)
महाविकास आघाडीत तणाव ?
महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आधीच एकत्रित राहून निवडणुका लढण्याची भूमिका घेतली होती. मात्र, उबाठाच्या या निर्णयामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी नवा पेच निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीत राहून सर्वांनी एकत्रित ताकद दाखवावी, अशी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका आहे.
(हेही वाचा – श्रीकृष्ण जन्मभूमीवरील अतिक्रमणांच्या सर्व याचिकांवर Supreme Court मध्ये एकत्र सुनावणी होणार)
लोकसभा-विधानसभेसाठी स्वबळाची गरज : अरविंद सावंत
उबाठाचे खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी स्वबळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. दक्षिण मुंबईचे खासदार असलेल्या सावंत यांनी सांगितले की, महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतींसारख्या स्थानिक निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांना संधी देणे आवश्यक आहे. “कार्यकर्त्यांना संधी देताना जर अडचणी येत असतील, तर पक्षाने स्वावलंबी होऊन स्वबळावर लढले पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांनी दिलेल्या स्वबळाच्या नाऱ्याला पाठिंबा दर्शवत सावंत म्हणाले की, “राऊत यांची भूमिका निश्चितच स्वागतार्ह आहे.” या वक्तव्यामुळे ठाकरे गटाचा स्वबळावर लढण्याचा निर्धार अधोरेखित झाला आहे. (Prakash Ambedkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community