- ऋजुता लुकतुके
उजास एनर्जी ही पर्यावरणपूरक ऊर्जा क्षेत्रातील एक महत्त्वाची मिडकॅप कंपनी आहे. छतांवर सौरऊर्जा पॅनल बांधून देणारी ही देशातील पहिली आणि सगळ्यात मोठी कंपनी आहे. त्यानंतर कंपनीने इलेक्ट्रिक दुचाकींच्या क्षेत्रातही प्रवेश केला आहे. उजास शब्दाचा अर्थ ‘पहाटेची पहिली किरणं’ असा आहे आणि कंपनीचं तेच ध्येय आहे. सौरऊर्जा प्रकल्प विकसित करण्याचं. मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांकडे किंवा वसाहतींमध्ये असलेल्या मोकळ्या जागेत छोटेखानी सौरऊर्जा प्रकल्प उभारून प्रकल्पांची ऊर्जा गरज भागवण्याचं काम ही कंपनी करते. डीएसएल, सरदार सरोवर निगम यासारखे काही सरकारी प्रकल्प उजासची सेवा घेतात. त्यातूनच कंपनी हळू हळू मोठी झाली आहे. (Ujaas Energy Share Price)
आतापर्यंत २२६ मेगावॅट इतकी वीज अशा प्रकल्पांमधून उजासने निर्माण केली आहे. २००८ मध्ये कंपनी एनएससी आणि बीएससीवर सूचीबद्ध झाली आणि तेव्हापासून कंपनीची वाटचाल सकारात्मक राहिली आहे. अलीकडेच म्हणजे ऑक्टोबर २०२४ मध्ये कंपनीने भागधारकांना एकावर चार बोनस शेअर देऊ केले. ही एक मोठी घडामोड होती आणि त्यानंतर मागच्या सहामागीत या शेअरने तब्बल १२५ टक्क्यांची उसळी अनुभवली आहे. त्यानंतर नवीन वर्षात मात्र काहीशी नफारुपी विक्री शेअरमध्ये आलेली दिसते. (Ujaas Energy Share Price)
(हेही वाचा – ITC Share Price : आयटीसीपासून आयटीसी हॉटेल्स वेगळे होण्याची प्रक्रिया सुरू, शेअरवर काय परिणाम?)
सध्या हा शेअर ५२० रुपयांवर ट्रेड करत आहे. तर कंपनीचं भांगभांडवल ५,५५० कोटी रुपयांचं आहे. ५२ आठवड्यांचा उच्चांक ७०९ रुपयांचा आहे आणि तो गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात साध्य झाला होता. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राची एकूणच मागच्या वर्षभरात पिछेहाट झाली आहे. देखभाल आणि उभारणीचा खर्च जास्त आणि परतावा कमी अशी अवस्था असलेल्या या क्षेत्रात टिकून राहण्याचं आव्हान उजाससमोर आहे. (Ujaas Energy Share Price)
सध्या हा शेअर ५, १०० आणि २०० दिवसांच्या मूव्हिंग ॲव्हरेजवर ट्रेड करत आहे. तर मागच्या महिनाभरात चढ उतारांमुळे ट्रेडिंगसाठी हा शेअर काही दिवस उपलब्ध नव्हता. (Ujaas Energy Share Price)
(टिप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जबाबदारीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी-विक्रीवर सल्ला देत नाही)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community