- ऋजुता लुकतुके
जन स्मॉल फायनान्स बँक ही देशातील चौथ्या क्रमांकाची स्मॉल फायनान्स बँक आहे. १९९९ मध्ये सुरुवात झाल्यानंतर या बँकेनं २२ राज्य आणि २ केंद्रशासिक प्रदेशांमध्ये ७७३ शाखांपर्यंत मजल मारली आहे. यातील २७३ शाखा कुठलीही बँक नसलेल्या भागांमधील आहेत. गावातील तसंच शहरातील लोकांना मायक्रो फायनान्स देण्याच्या उद्देशाने या बँकेची स्थापना झाली आहे आणि २००८ पासून १२ लाख ग्राहकांना या बँकेनं सेवा दिली आहे. अलीकडेच खास शहरी उद्योजकांसाठी त्यांनी मायक्रो फायनान्सशी संबंधित उपक्रम सुरू केला आहे. (Jana Small Finance Bank Share Price)
पण, बँकिंग क्षेत्राला मागच्या सहामाहीत बसलेल्या फटक्यातून ही बँकही वाचलेली नाही. जन स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअरमध्ये मागच्या सहा महिन्यात ४३ टक्क्यांची घसरण झाली आहे. बँकेची स्थिती आणि त्याचबरोबर ऑक्टोबर आणि पाठोपाठ डिसेंबरमध्ये आलेल्या तिमाही आकड्यांचा फटका बँकेच्या शेअरना बसला आहे. शुक्रवारी हा शेअर ३ टक्क्यांच्या घसरणीसह ३८९ वर बंद झाला आणि या घसरणीची सुरुवात ऑक्टोबरमध्ये दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले तेव्हापासून झाली आहे. बँकेचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ७६० रुपयांचा आहे. म्हणजेच हा शेअर उच्चांकापासून ५० टक्क्यांनी घसरला आहे. (Jana Small Finance Bank Share Price)
(हेही वाचा – Mahakumbh मेळ्यात पाहायला मिळणार पाच देशांच्या संस्कृतीचा मिलाफ)
कंपनीचं शेअर बाजारातील भाग भांडवल ४.९ कोटी रुपयांचं आहे. नफ्यावरील परतावाही ५.६५ टक्के इतका तगडा आहे. सध्या शेअर ५२ आठवड्यातील नीच्चांक म्हणजे ३६५ च्या आसपासच ट्रेड करत आहे, ही काळजीची गोष्ट आहे. ऑक्टोबरमध्ये गाठलेल्या या नीच्चांकानंतर कंपनीला म्हणावी तशी प्रगती करता आलेली नाही. याचं कारण कंपनीची आर्थिक स्थिती सलग दोन तिमाही खालावली आहे. ऑक्टोबरमध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीत कंपनीचा निव्वळ नफा २१ टक्क्यांनी कमी झाला. (Jana Small Finance Bank Share Price)
तर कंपनीचा एकूण खर्चही २१.३५ टक्क्यांनी वाढला आहे. शहरात नवीन कर्ज योजना सुरू करणं तसंच ग्रामीण भागात वाढलेल्या शाखा यामुळे खर्चात वाढ झाली आहे. पण, त्यामुळे कंपनीची बचत आणि करंट खाती अनुक्रमे ९ आणि १२ टक्क्यांनी वाढली आहेत. तसंच मुदतठेवींमध्येही वाढ झाली आहे. २०२५ साली बँकिंग क्षेत्राला उभारी आली तर त्याचा सकारात्मक परिणाम या शेअरवर बघायला मिळू शकतो. (Jana Small Finance Bank Share Price)
(टिप – शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. गुंतवणूकदारांनी स्वत:च्या जबाबदारीवर गुंतवणूक करावी. हिंदुस्थान पोस्ट शेअरच्या खरेदी-विक्रीवर सल्ला देत नाही)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community