diveagar beach resort : दिवेआगर समुद्र किनार्‍यावर घेऊ शकता अल्हाददायक अनुभव आणि बीच रिसॉर्ट्सचा आनंद

31
diveagar beach resort : दिवेआगर समुद्र किनार्‍यावर घेऊ शकता अल्हाददायक अनुभव आणि बीच रिसॉर्ट्सचा आनंद

महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यावर वसलेला दिवेआगर समुद्र किनारा म्हणजे एक स्वर्गीय ठिकाण आहे. या समुद्र किनाऱ्यावर सुंदर पांढरी वाळू, चमकदार निळं पाणी, उंच नारळाची झाडं आणि असंख्य सुपारीची झाडं आहेत. दिवेआगरचा समुद्र किनारा हा महाराष्ट्र राज्यातला रायगड जिल्ह्यात असलेला एक अतिशय मनमोहक किनारा आहे.

मुंबईपासून सुमारे १७० किलोमीटर आणि पुण्यापासून १५९ किलोमीटर एवढ्या अंतरावर असलेला हा शांत समुद्र किनारा तुमच्या कुटुंबासोबत आणि प्रियजनांसोबत निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. हा समुद्रकिनारा सुमारे ६ किलोमीटरच्या विस्तीर्ण किनारपट्टीपर्यंत पसरलेला आहे. तसंच हा किनारा इथे असणाऱ्या सुरुच्या झाडांसाठीही ओळखला जातो. या नयनरम्य समुद्रकिनाऱ्याच्या एका टोकाला कोळी लोकांची वस्ती आहे. तर दुसऱ्या टोकावर स्थलांतरित झालेले सीगल पक्षी हजारोंच्या संख्येने दिसतात. निसर्गप्रेमी, वन्यजीवप्रेमी आणि साहसी क्रीडा प्रेमींसाठी हा समुद्र किनारा म्हणजे एक परिपूर्ण सुट्टीचं ठिकाण आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी करता येतात.

शहराच्या गर्दीपासून दूर जाऊन रोमांचक आठवणी साठवण्यासाठी दिवेआगर समुद्रकिनारा हे एक आदर्श ठिकाण आहे. जवळच्या शहरांमधून समुद्रकिनाऱ्याकडे जाणारा निसर्गरम्य रस्ता तुमच्या संवेदना आणखी फुलवतो. या ठिकाणचे सुंदर परिसर आणि मनमोहक निसर्गसौंदर्य तुमच्या हृदयात आयुष्यभर कोरले जाईल. (diveagar beach resort)

(हेही वाचा – Kalyan Jewellers Share Price : कल्याण ज्वेलर्समध्ये सलग सहाव्या सत्रात मंदी, आता पुढे काय?)

दिवेआगर बीचवर या रोमांचक ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हा

शांत असलेला दिवेआगर बीच हा फक्त तुम्हाला निसर्गरम्य आठवणी देत नाही तर, काही आकर्षक आणि मजेदार ऍक्टिव्हिटीमध्येही तुम्ही सहभागी होऊ शकता. साहसप्रेमी पर्यटकांसाठी या समुद्रकिनाऱ्यावर अनेक साहसी खेळ खेळता येतात.

या समुद्रकिनाऱ्यावर सूर्योदय आणि सूर्यास्त पाहण्याच्या अनमोल क्षणाचे साक्षीदार असणाऱ्या पर्यटकांना अतिशय सुंदर अनुभव मिळतो. (diveagar beach resort)

शांत दिवेआगर बीचवर पर्यटकांसाठी आकर्षक जलक्रीडा उपलब्ध आहेत. या ठिकाणी येणारे पर्यटक पॅरासेलिंग आणि मोटर बोटिंगचा आनंद घेऊ शकतात. तसंच समुद्र किनाऱ्याजवळ घोडेस्वारी देखील करू शकतात आणि थंड वारा आणि आल्हाददायक निसर्गाचा आनंद घेऊ शकतात.

जंजिरा किल्ला, पद्मदुर्ग किल्ला आणि भगवान सुवर्णगणेश मंदिर आणि रूपनारायण मंदिर यांसारखी काही प्रमुख स्थळं इथून जवळपास आहेत.

(हेही वाचा – Mahakumbh मेळ्यात पाहायला मिळणार पाच देशांच्या संस्कृतीचा मिलाफ)

दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर कसं पोहोचता येतं?

दिवेआगर समुद्रकिनारा हा मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांच्या जवळ आहे. मुंबईपासून सुमारे १७० किलोमीटर आणि पुण्यापासून १५९ किलोमीटर एवढ्या अंतरावर हा दिवेआगरचा समुद्र किनारा आहे. या समुद्रकिनाऱ्यापर्यंत वाहतुकीच्या विविध माध्यमांनी सहज पोहोचता येतं.

रस्त्याने :

मुंबई किंवा पुण्याहून दिवेआगर समुद्रकिनाऱ्यापर्यंतची रोड ट्रिप ही पर्यटकांना एक रोमांचक अनुभव देते. तसंच प्रमुख शहरांमध्ये नियमितपणे धावणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या बसेसद्वारे दिवेआगर समुद्रकिनाऱ्यापर्यंत सहज पोहोचता येतं. दिवेआगरपासून ६ किलोमीटर एवढ्या अंतरावर असलेल्या श्रीवर्धन येथून समुद्र किनाऱ्यापर्यंत बसने पोहोचता येतं. मुंबईहून दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर पोहोचण्यासाठी फक्त ३ ते ४ तास लागतात. (diveagar beach resort)

रेल्वेने :

दिवेआगर शहरात रेल्वे स्टेशन नाही. दिवेआगर समुद्र किनाऱ्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वात जवळचं रेल्वे स्थानक हे सुमारे ३० किलोमीटर एवढ्या अंतरावर असलेलं माणगाव रेल्वे स्थानक हे आहे. इथून तुम्ही दिवेआगरला जाण्यासाठी टॅक्सी भाड्याने घेता येते.

विमानाने :

विमानाने दिवेआगरला पोहोचायचं असेल तर मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पुणे इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरूनही जाता येतं.

(हेही वाचा – Jana Small Finance Bank Share Price : जन स्मॉल फायनान्स बँकेच्या शेअरमध्ये का होतेय घसरण?)

दिवेआगर इथले काही प्रसिद्ध बीच रिसॉर्ट्स

  • शिवांश कॉटेज
  • श्री स्वामी समर्थ रिसोर्ट
  • कोको पाम्स रिसोर्ट
  • VITS सिलेक्ट कोझुरिना
  • एमिज रिट्रीट
  • ग्रँड एम्बीएन्स रिसोर्ट
  • तेंडुलकर बीच रिसोर्ट
  • एक्झॉटिका बाय दि सी

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.