- विशेष प्रतिनिधी, मुंबई
दादर पश्चिम येथील रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर (Hawkers) कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश असताना प्रत्यक्षात या भागातील फेरीवाल्यांवर कारवाई न करता त्यापुढील फेरीवाल्यांवर कारवाई केली जात होती. परंतु, दादरमधील टोरेस कंपनीचा घोटाळा समोर येताच शिवाजी पार्क पोलिसांवर चारही बाजूंनी आरोप तथा टिका होऊ लागताच या पोलिसांना दीडशे मीटर परिसरातील फेरीवाले दिसू लागले. त्यामुळे मागील काही दिवसांपासून दीडशे मीटरच्या पुढील फेरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांनी महापालिकेच्या मदतीने दीडशे मीटर परिसर शनिवार, रविवार आणि सोमवारी फेरीवालामुक्त करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईतील २० ठिकाणे फेरीवालामुक्त करण्याची मोहिम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आली असून यामध्ये दादर पश्चिम परिसराचा समावेश आहे. दादर रेल्वे स्थानकाला जोडून असलेला सेनापती बापट मार्गाचा परिसर, केशवसूत उड्डाणपुलाखालील परिसर, रानडे मार्ग, डिसिल्व्हा रोड आणि जावळे मार्गावर स्थानकापासून दीडशे मीटरचा परिसर फेरावाला (Hawkers) मुक्त ठेवण्यासाठी कारवाई करणे आवश्यक आहे. परंतु रेल्वे स्थानकाच्या आसपासच्या परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई न करता दीडशे मीटर बाहेरील फेरीवाल्यांवर कारवाई केली जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात असे. दीडशे मीटर परिसरातील फेरीवाल्यांवरील कारवाईला वेगळे वळण देऊन ही कारवाई थांबली जावी यासाठी दीडशे मीटर परिसरातील फेरीवाल्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात होते. त्यामुळे या कारवाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.
(हेही वाचा – Butterfly Festival : चेंबूरच्या डायमंड गार्डनमध्ये फुलपाखरु महोत्सव)
परंतु दादर मधील टोरेस कंपनीचा आर्थिक घोटाळा समोर आला आणि शिवाजी पार्क पोलिसांच्या हद्दीत प्रकार घडूनही पोलिसांना याची कल्पना नव्हती का असा प्रश्न प्रत्येकाकडून व्यक्त केला जात आहे. एका बाजtला फेरीवाल्यांची (Hawkers) माहिती घेऊन कारवाई करणारे पोलिस एवढी मोठी कंपनी स्थापून घोटाळा करत होती, तिथे पोलिसांचा दुर्लक्ष कसा असा प्रश्न विचारला जात आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार दीडशे मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई न करता त्यापुढील फेरीवाल्यांवर कारवाई करणारे पोलिस टोरेस कंपनीला केवळ समन्स पाठवून गप्प बसल्याने याप्रकरणी पोलिसच आता जनतेच्या रडारवर आले आहे तसेच पोलिसांच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क व दादर पोलिसांनी रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर (Hawkers) कडक कारवाई करण्यासाठी आग्रही पाऊल उचलले आहे. शनिवार, रविवार आणि सोमवारी तिन दिवस ही कारवाई कडक केली जाईल अशाप्रकारचा निर्धार पोलिसांसह महापालिका प्रशासनाने घेतला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जी कारवाई यापूर्वी अपेक्षित होती, ती कारवाई आता सुरु केल्याने दादरकरांकडून समाधान व्यक्त केले जात आहे, तसेच फेरीवाल्यांकडून या कारवाईचे समर्थन केले जात आहे. परंतु ही करवाई तीन दिवस न करता आठवड्याचे सातही दिवस केली जावी अशाप्रकारची मागणी केली जात आहे. त्यामुळे दीडशे मीटर परिसरातील जे फेरीवाला पोलिस आणि महापालिकेला दिसत नव्हते ते आता दिसू लागल्याने एकप्रकारे समाधान व्यक्त करताना दिसून येत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community