National Youth Day : स्वामी विवेकानंद जयंती – राष्ट्रीय युवा दिन का साजरा केला जातो?

57
National Youth Day : स्वामी विवेकानंद जयंती - राष्ट्रीय युवा दिन का साजरा केला जातो?

राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day) हा दिवस दरवर्षी १२ जानेवारी रोजी साजरा केला जातो. १२ ते १६ जानेवारी दरम्यान युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. १९८५ पासून देशभरात हा दिवस साजरा केला जात आहे. या दिवशी आपण स्वामी विवेकानंदांचे विचार आणि कार्य आठवण करुन युवकांमध्ये प्रेरणा जागृत करतो.

१२ जानेवारी म्हणजे स्वामी विवेकानंद यांची जयंती! आजच्या तरुणांनी स्वामीजींकडून प्रेरणा घ्यावी हा महत्त्वाचा उद्देश आहे. भारत सरकारने १९८४ मध्ये हा दिवस राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day) म्हणून घोषित केला. स्वामी विवेकानंदांचा असा विश्वास होता की तरुण हा समाजाचा सर्वात महत्वाचा घटक आहे. जर त्यांना योग्य मार्ग दाखवला गेला तर ते देशाची आणि जगाची दिशा पूर्णपणे बदलू शकते.

(हेही वाचा – मी जबाबदारी घेतो…; गोध्रा हत्याकांडाविषयी काय म्हणाले PM Narendra Modi ?)

२०२५ मध्ये राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day) रविवार १२ जानेवारी रोजी साजरा केला जाईल. या दिवसानिमित्त शाळा, महाविद्यालये आणि युवा संघटनांसाठी विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जातात. १८९३ मध्ये शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म संसदेतील विवेकानंदांचे भाषण प्रचंड गाजले. “अमेरिकेच्या भगिनी आणि बांधवांनो” या पहिल्याच वाक्याला टाळ्यांचा कडकडाट झाला.

दरवर्षी १२ ते १६ जानेवारी दरम्यान, भारत सरकार, विशेषतः युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय, राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करते. राष्ट्रीय युवा महोत्सव १९९५ मध्ये राष्ट्रीय एकात्मता शिबिर (एनआयसी) कार्यक्रमांतर्गत एक प्रमुख उपक्रम म्हणून सुरू झाला. भारत सरकार दरवर्षी नेहरू युवा केंद्र संघटना (NYKS) आणि राष्ट्रीय सेवा योजना (NSS) सारख्या राज्य आणि संस्थांपैकी एकाच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित करते. (National Youth Day)

(हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी का सोडली ? Prakash Ambedkar यांचे खळबळजनक विधान)

सरकारी संस्थांव्यतिरिक्त राष्ट्रीय युवा दिन रामकृष्ण मठ, रामकृष्ण मिशन आणि त्यांच्या शाखांमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी भक्तिगीते गायली जातात. धार्मिक भाषणे होतात. आरती केली जाते. हे सर्व कार्यक्रम तरुणांना स्वामीजींच्या आदर्शांकडे घेऊन जातात. तसेच अनेक सामाजिक संस्थाही अनेक उपक्रम राबवतात. (National Youth Day)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.