BEST Bus : बेस्टची बस थेट चहाच्या टपरीवर

276
BEST Bus : बेस्टची बस थेट चहाच्या टपरीवर
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मागील काही दिवसांपासून बेस्टच्या बसेसचे (BEST Bus) अपघात होण्याचे सत्र सुरुच असून शनिवारी विक्रोळी कन्नमवार नगर बस चौकीच्या ठिकाणी खासगी कंपनीची बस थेट चहाच्या टपरीवरच पोहोचली. बस चालक बस सुरु ठेवून खाली उतरला आणि बस प्रवर्तकाकडे वेळ विचारण्यास गेला, तोच बस पुढील भागात जावून चहाच्या टपरीवर जावून धडकली. यात चहाच्या टपरीचे नुकसान झाले असून एक पादचारी किरकोळ जखमी झाला आहे.

(हेही वाचा – मी जबाबदारी घेतो…; गोध्रा हत्याकांडाविषयी काय म्हणाले PM Narendra Modi ?)

अंधेरी आगरकर चौक ते विक्रोळी कन्नमवार नगर अशी धावणारी बस क्रमांक १८५ ही बस शनिवारी दुपारी साडे अकराच्या सुमारास आगरकर चौकवरून कन्नमवार नगर येथे आली असता बस चालकाने गाडी बसस्थानकामध्ये उभी केली व प्रवर्तकाकडे बसची वेळ विचारण्यास निघून गेला, त्या वेळेस बस चालकांनी बस गाडीचा हँडब्रेक न लावण्याने बसगाडी पुढे गेली व पुढील चहाच्या टपरीवर जावून धडकली. (BEST Bus)

(हेही वाचा – उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी का सोडली ? Prakash Ambedkar यांचे खळबळजनक विधान)

त्यामध्ये चहाच्या टपरीचे किरकोळ नुकसान झाले व बस गाडीच्या पुढील काचेला तडे जाऊन नुकसान झाले आहे. तसेच चहाच्या टपरी जवळ उभ्या असलेल्या बिल्डिंग मधील काम करणार्‍या एक रोजंदारी कामगार लिफन चंद्ररडा राणा (वय २०) यांच्या डाव्या हाताला किरकोळ जखम झाली. ही बस डागा ग्रुप मारुती यांची असून याबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल नसून पोलिसांनी बस वाहकाला तक्रारीअभावी सोडून दिल आहे. (BEST Bus)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.