Ravindra Chavan यांची भाजपाच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

40
Ravindra Chavan यांची भाजपाच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती
Ravindra Chavan यांची भाजपाच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती

भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी दि. ११ जानेवारी रोजी रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची भाजपाच्या महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. शिर्डी येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय महाधिवेशनाआधी झालेल्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (Ravindra Chavan)

( हेही वाचा :  BMC : कचरा वाहतूक करणारी कंत्राटदारांची अनेक वाहने बंद; महापालिकेच्या वाहनांवरील वाढतोय भार

दरम्यान रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांची येत्या काळात महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे. मात्र महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हेच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्याकडे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्त्वातील महायुती सरकार सत्तेत असताना सार्वजनिक बांधकाम मंत्रिपदाची जबाबदारी होती. मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळालं नाही. मंत्रिपद डावलल्यानंतर रवींद्र चव्हाण यांच्याकडे पक्षातील मोठी जबाबदारी दिली जाईल, अशी चर्चा होती. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याकडे असलेली प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्याकडे दिली जाईल, अशी माहितीही सूत्रांच्या हवाल्याने दिली जात आहे.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.