मुंबईतील कुर्ला पश्चिम भागातील एका हॉटेलमध्ये (Rangoon Zaika) दि. ११ जानेवारी रोजी भीषण आग लागली. या आगीत जीवितहानी झालेली नाही. यासंदर्भात मुंबई महापालिकेने माहिती जारी केली आहे. दरम्यान एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रात्री ९.०५ वाजता एलबीएस रोडवरील रंगून जायका (Rangoon Zaika) हॉटेलमध्ये भीषण आग लागली आणि आग विझवण्यासाठी चार अग्निशमन गाड्या आणि चार पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झाले. (Kurla)
( हेही वाचा : Veer Savarkar : साने गुरुजी इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पाहिला ‘स्वातंत्र्यवीर लाईट अँड साऊंड शो’)
दरम्यान ही आग पहिल्या पातळीची (म्हणजे कमी तीव्रतेची) असल्याची माहिती आहे. कोणीही या आगीत होरपळल्याची माहिती नाही. मात्र अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत, तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तसेच आग विझवण्याच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका कर्मचारी, पोलिस अधिकारी आणि वीज पुरवठा कर्मचारी घटनास्थळी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आगीची भीषणता लक्षात घेऊन ०४ एफई, ०३जेटी, ०१ एडब्ल्यूटीटी, ०१ डब्ल्यूक्यूआरव्ही, १०८ रुग्णवाहिका, ०१ एडीएफओ, ०२ एसओ, पोलिस दल, वाहतूक पोलिस आणि वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. (Kurla)(Rangoon Zaika)
Join Our WhatsApp Community