Bangladesh तील हिंदूंवर अत्याचार सुरूच; बांगलादेशातील पोलिसांचा अहवाल जारी

38
Bangladesh तील हिंदूंवर अत्याचार सुरूच; बांगलादेशातील पोलिसांचा अहवाल जारी
Bangladesh तील हिंदूंवर अत्याचार सुरूच; बांगलादेशातील पोलिसांचा अहवाल जारी

बांगलादेशात (Bangladesh) अजूनही हिंदू अन्याय अत्याचार सुरुच आहे. यासंदर्भात बांगलादेशी पोलिसांनी हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्या अहवालात हिंदूंसह (Hindu) अल्पसंख्यांकांविरुद्ध होणाऱ्या हिंसाचाराला राजकीय हिंसाचार असल्याचे बोलले जात आहे. या अहवालानुसार, दि. ४ ऑगस्ट २०२४ ते २० ऑगस्ट २०२४ दरम्यान अल्पसंख्याकांविरोधात घडलेल्या १ हजार ४१५ घटनांपैकी ९८.४ टक्के प्रकरणे राजकीयदृष्ट्या प्रेरित असून यापैकी १.५९ टक्के घटना जातीय कारणांमुळे घडल्या आहेत. (Bangladesh)

( हेही वाचा : उल्हासनगर निरीक्षणगृहातील अधिकाऱ्यांची हकालपट्टी करा; उपसभापती Neelam Gorhe यांचे आदेश

बांगलादेशात (Bangladesh) हिंदूंसह (Hindu) अल्पसंख्यांकांवर दि. ४ ते २० ऑगस्ट २०२४ या कालावधीत २ हजार १० हल्ले झाले आहेत. यामध्ये मालमत्ता, प्रार्थनास्थळे आणि जीवनावरील हल्ले समाविष्ट होते. त्यातच पोलिसांनी दिलेल्या अहवालानुसार, अल्पसंख्यांकांवरील हल्ल्याच्या १ हजार ७६९ घटना घडल्या आहेत. त्यातून १ हजार ४१५ प्रकरणाचा तपास पूर्ण झाला. उर्वरित ३५४ प्रकरणांची चौकशीही सुरू करण्यात आली आहे. अशातच १६१ प्रकरणांमध्ये कोणताही पुरावा अद्यापही सापडला नाही. याप्रकरणाची पडताळणी केलेल्या प्रकरणांपैकी १ हजार २३४ घटना राजकीय हिंसाचार म्हणून वर्णन केल्या गेल्या आणि फक्त २० घटना सांप्रदायिक म्हणून वर्णन करण्यत आले. (Bangladesh)

बांगलादेशातील (Bangladesh) पोलिसांनी सांगितले की, या अहवालाआधी आम्ही काही पीडित आणि साक्षीदारांशी यासंदर्भात चर्चा केली. तसेच पीडितांना औपचारिक तक्रारी दाखल करण्यास प्रोत्साहित करण्यात आले. याशिवाय सुरक्षेसाठी पावले उचलण्यात आली आहेत. बांगलादेशात हिंदूंवरील हिंसाचाराच्या घटनांवर नजर टाकली असता ५ ऑगस्ट २०२४ रोजी १४५२ घटना घडल्या. शेख हसीना (Sheikh Hasina) यांना ढाका सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला होता. यानंतर, संपूर्ण देशाची व्यवस्था बदलली, तेव्हा किती प्रकरणे नोंदवली गेली असती आणि कशी झाली असती याची कल्पनाच करता येते. दरम्यान बांगलादेशी हिंदू (Hindu) , बौद्ध, ख्रिश्चन युनिटी कौन्सिलचे म्हणणे आहे की, सरकार या हल्ल्यास राजकीय रंग देत खर समस्या लवण्याचे काम करत आहे. अल्पसंख्यांकांवर होणारे हल्ले धार्मिक स्वातंत्र्यावर होणारे थेट हल्ले आहेत. (Bangladesh)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.