देशातील पाच प्रमुख बंदरांपैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदरावर (Jawaharlal Nehru Port) (JNPA) येणारी कंटेनर वाहतूक कमी करण्याची तयारी सुरू आहे. यासाठी जेएनपीए ते जुन्या पुणे महामार्गापर्यंत एक नवीन विशेष महामार्ग बांधला जात आहे. २९ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग, एकूण २,९०० कोटी रुपये खर्चून बांधला जाणार आहे, तो भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) द्वारे बांधला जाईल. दरम्यान, दररोज पाच हजार पेक्षा अधिक कंटनेर आणि ट्रक पुण्याकडून जेएनपीएवर येत असतात. त्याच प्रमाणात ठाण्याकडून जेएनपीएकडे ट्रक येत असतात. (Mumbai)
या दोन्ही दिशेने येणारे ट्रक ठाणे-बेलापूर रोड (Thane-Belapur Road) किंवा पुणे एक्स्प्रेस (Pune Express) वे पनवेल किंवा बेलापूर, खारघर भागातील रस्त्यांचा वापर करतात. त्यामुळे या भागातून दररोज १०,००० मालवाहू वाहने जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन स्थानिकांना त्रास होतो. ही समस्या दूर करण्यासाठी NHAI ने हा हायवे तयार करण्याचे नियोजन केले आहे.
(हेही वाचा – Maha Kumbh Mela 2025 चे आयोजन : महसुलाचा स्रोत की खर्च?)
काय योजना आहे?
जेएनपीएजवळील पगोटे ते जुन्या मुंबई-पुणे महामार्गाच्या (Mumbai-Pune Highway) चौकात नवीन महामार्ग बांधण्यात येणार आहे. पगोटे हा राष्ट्रीय महामार्ग ३४८ वर वसलेला आहे. जो बेलापूर ते जेएनपीए, जेएनपीए रोडवर येतो. येथून हा नवीन महामार्गाचे अंतर २९.१९ किलोमीटर आहे. हा महामार्ग प्रामुख्याने एलिव्हेटेड असेल. यात एक पृष्ठभाग रस्ता आणि दोन बोगदे असतील. हा महामार्ग ६० मीटर रुंद आणि सहा लेनचा असणार आहे. याचा अर्थ दक्षिणेकडून (पुण्याकडे) येणाऱ्या वाहनांना पनवेल किंवा बेलापूरपर्यंत येण्याची गरज भासणार नाही.
महामार्गाची वैशिष्ट्ये
सहा लेन असलेले बोगदे– दोन यांचे अंतर १९०० मीटर आणि १७५० मीटर आहे)
मोठे पूल – सहा यांचे अंतर (९१०, २२०, २३०, ६०० , ४४० मीटर आणि १६० मीटर )
कधी होणार पूर्ण– ३० महिने
छोटे पूल– १७५ हेक्टर
फ्लओव्हर – ४
रस्त्यावरील पूल – २
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community