Veteran Day 2025 : माजी सैनिक दिनाच्या परेडमध्ये ५०० हून अधिक माजी सैनिक सहभागी

65

माजी सैनिक दिनाच्या (Veteran Day 2025) निमित्ताने तिन्ही सेवांमधील शौर्य पुरस्कार विजेत्यांसह ५०० हून अधिक माजी सैनिकांनी १२ जानेवारी २०२५ला मरीन ड्राइव्हवर परेड केली.  मुंबईतील नरिमन पॉइंट येथील एनसीपीए समोरील या सशस्त्र दलातील माजी सैनिकांच्या परेडला महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी हिरवा झेंडा दाखवला.

pared1

या कार्यक्रमासाठी (Veteran Day 2025) व्हाइस अ‍ॅडमिरल संजय जे. सिंह, एफओसी-इन-सी वेस्टर्न नेव्हल कमांड आणि तिन्ही सेवांमधील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नेव्ही फाउंडेशन, मुंबई चॅप्टर (एनएफएमसी) ने मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांडच्या सहकार्याने ही परेड आयोजित केली होती.

pared 2

(हेही वाचा हिंदूंच्या विरोधामुळे अवैध Madrasa प्रशासनाकडून जमीनदोस्त)

राज्यपालांनी युद्धातील माजी सैनिक, वीर नारी आणि सशस्त्र दलातील माजी सैनिकांचे स्वागत केले आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्यासोबत काही पावले चालत गेले. परेडमध्ये सहभागी झालेल्या माजी सैनिकांमध्ये एनएफएमसीचे अध्यक्ष कमांडर विजय वढेरा (निवृत्त) आणि एनएफएमसीचे माजी अध्यक्ष कॅप्टन राज मोहिंद्र (निवृत्त) यांचा समावेश होता.

parad3

१९५३ मध्ये स्वातंत्र्यानंतर भारतीय सैन्याचे पहिले कमांडर-इन-चीफ फील्ड मार्शल केएम करिअप्पा, ओबीई, यांनी देशासाठी गौरवशाली सेवा बजावल्यानंतर ते निवृत्ती झाले, त्यानंतर दरवर्षी १४ जानेवारी रोजी त्रि-सेवा माजी सैनिक दिन (Veteran Day 2025) साजरा केला जातो. परेडमध्ये आर्मी बँड, एनसीसी आणि एससीसी कॅडेट्सचाही सहभाग होता आणि देशाच्या सेवेत माजी सैनिकांच्या गौरवशाली योगदानाबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा या परेडच्या आयोजना मागील उद्देश होता.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.