भाजपमध्ये ज्यांना श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र समजला नाही त्यांची अवस्था सर्वांनी पाहिली; CM Devendra Fadnavis यांचे विधान

61

भाजपत श्रद्धा आणि सबुरी हा मंत्र पाळला जातो. ज्यांना हा मंत्र समजला ते यशस्वी झाले, ज्यांना नाही समजलं त्यांची निवडणुकीत काय अवस्‍था झाली हे सर्वांनी पाहिले आहे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शिर्डी येथे भाजपच्या महाअधिवेशनाला सुरुवात झाली आहे. या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) बोलत होते. या अधिवेशनासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची प्रमुख उपस्‍थिती होती.

विधानसभा निवडणुकीच्या लढाईत २४ तास अमित शाह सोबत उभे होते, लोकसभा निवडणुकीनंतर पार्टी हताश होती. कार्यकर्त्यांना कळत नव्हते की काय चुकले ज्यामुळे असा पराभव झाला. त्यानंतर अमित शाह यांनी महाराष्ट्राचा दौरा केला, हजारो कार्यकर्त्यांना भेटत मार्गदर्शन केले, त्यांच्या मनात विजयाची खात्री दिली आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्‍साह दुणावला, संपूर्ण पक्ष उभा राहिला आणि हा महाविजय खेचून आणला. त्यासाठी अमित शाह यांचे खूप खूप आभार मानतो, असेही मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले.

(हेही वाचा Muslim कट्टरपंथींनी केला हिंदू तरुणांवर हल्ला; म्हणाले, आमचे सरकार येऊ द्या, आम्ही तुमचा गळा कापून…)

महाराष्ट्राच्या जनतेने भाजपला शंभरहून अधिक जागा दिल्या, गेल्या 30 वर्षात ही कामगिरी करणारा भाजप एकमेव पक्ष आहे. महायुतीने 288 पैकी 237 जागा जिंकून आपण इतिहास निर्माण केला आणि मेरिटमध्ये पास झाला. आजवरच्या सत्ताधारी पक्षाच्या संख्येचा रेकॉर्ड भाजपने तोडला आहे. पुढे त्‍यांनी विरोधीपक्षावर टिका करताना फडणवीस म्‍हणाले, काँग्रेस, शरद पवारांचा पक्ष आणि उबाठाने राज्यात व्होट जिहाद केला, निवडणुकीत पराभव केला तरी ते शांत बसले नाहीत. पुढे त्‍यांनी ‘एक हैं तो सेफ हैं हे मोदींजींनी सांगितलं आणि ते निवडणुकीत खरं ठरलं, असेही मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.