महाराष्ट्राच्या विकासाशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही; केंद्रीय मंत्री Amit Shah यांचे विधान

41
महाराष्ट्राच्या विकासाशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही; केंद्रीय मंत्री Amit Shah यांचे विधान
महाराष्ट्राच्या विकासाशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही; केंद्रीय मंत्री Amit Shah यांचे विधान

सेनापती बापट आपल्या काव्यपंक्तीत म्हणतात, ‘महाराष्ट्रविना राष्ट्रगाडा न चाले’, असे बापट म्हणाले होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाशिवाय देशाचा विकास असंभव आहे. तसेच महाराष्ट्र नेहमीच विकासाच्या दृष्टीने पुढे जात आहे. महाराष्ट्राने नेहमीच देशाचं नेतृत्व केलेले आहे, असे विधान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी शिर्डी येथील भाजपाच्या महाधिवेशन केली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपाचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

( हेही वाचा : Muslim कट्टरपंथींनी केला हिंदू तरुणांवर हल्ला; म्हणाले, आमचे सरकार येऊ द्या, आम्ही तुमचा गळा कापून…

समृद्धी महामार्ग, पुणे मेट्रो, पुणे विमानतळ, गडचिरोली स्टिल फॅक्टरी, नवी मुंबई विमानतळ, मुंबई मेट्रोचा विकास, दिल्ली मुंबई आर्थिक कॉरिडॉर अशी अनेक कामे महाराष्ट्रात सुरु आहेत. तसेच गुंतवणुकीत ही महाराष्ट्र पुढे आहे, असे म्हणत शाह यांनी प्रकल्प पळवल्याच्या विरोधकांच्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये विधानसभेपेक्षाही मोठा विजय झाला पाहिजे, असे आवाहन अमित शाह (Amit Shah) यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केले.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील आतंकवाद संपवून टाकला. त्यामुळे ३१ मार्च २०२६ रोजी देशातील नक्षलवाद संपवणार. त्याचबरोबर महराष्ट्रात स्थिर सरकार आणण्याचं काम तुम्ही केलं. त्यामुळेच २०२४ हे वर्ष भाजपासाठी महत्त्वाचं वर्ष ठरलं, असे ही शाह (Amit Shah) म्हणाले.

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.