आज महाराष्ट्रातील महाविजयानंतर आपण सगळे एकत्र आलो आहोत. त्यामुळे तुम्हाला माहिती नाही की तुम्ही किती मोठे कार्य केले आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले. आपले सोबतचे घटक पक्ष खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादीला देखील मोठे यश मिळाले. शरद पवारांनी जे धोकेबाजीचे राजकारण सुरू केले होते त्याला २० फुट खाली जमिनीत आपण गाडून टाकले आहे, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केली. शिर्डी येथील भाजपाच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात ते बोलत होते. (Amit Shah)
( हेही वाचा : Chhattisgarh Naxalism: विजापूरच्या राष्ट्रीय उद्यानात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, 3 नक्षलवादी ठार)
पुढे अमित शाह म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी आपल्यासोबतचे द्रोह केले होते. २०१९ ला विचारधारा सोडली, बाळासाहेबांची विचारधारा सोडली, अशा उद्धव ठाकरेंना आपण सर्वांनी मिळून त्यांची जागा दाखवून दिली. २०२४ पर्यंत महाराष्ट्राचे राजकारण अस्थिर होते, त्याला स्थिर करण्याचे कार्य तुम्ही सर्वांनी मिळून मजबूत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार आणून केले आहे, असे ही शाह (Amit Shah) म्हणाले.
तसेच लोकसभा निवडणुकीनंतर (Lok Sabha elections) विरोधकांना वाटत होते की, त्यांचे सरकार महाराष्ट्रावर सत्तेत येईल. परंतु त्यांचे हे स्वप्न आपण सर्वांनी मिळून धुळीस मिळवले. त्यामुळे काही निवडणुका अशा असतात ज्या देशाच्या राजकारणाला प्रभावित करतात. महाराष्ट्राच्या सरकारने हे करून दाखवले आहे. या सगळ्याचे शिल्पकार म्हणजे भाजपाचे कार्यकर्ते आहेत, त्यांना माझा प्रणाम, असे ही शाह (Amit Shah) यांनी सांगितले.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community