Walmik Karad चा शस्त्र परवाना रद्द; बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई

55
Walmik Karad चा शस्त्र परवाना रद्द; बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई
Walmik Karad चा शस्त्र परवाना रद्द; बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची मोठी कारवाई

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची गेल्या महिन्यात 9 डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी विविध समित्याही नियुक्त करण्यात आल्या आहेत. या हत्येचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड असल्याचे बोललं जात आहे. संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याकांड आणि खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणी आता वाढत चालल्या आहेत. वाल्मिक कराडचा (Walmik Karad) शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे. बीडच्या (Beed) जिल्हाधिकाऱ्यांनी ही मोठी कारवाई केली आहे. (Walmik Karad)

( हेही वाचा : शरद पवारांनी दगा-फटक्याचे राजकारण केले म्हणून त्यांना २० फुट खाली जमिनीत गाडले; Amit Shah यांचा हल्लाबोल

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आज सर्वात मोठी कारवाई केली आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी वाल्मिक कराडसह 100 जणांना नोटीस बजावली आहे. लवकरात लवकर शस्त्र जमा केलं नाही, तर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटीसमधून दिला आहे. यामध्ये वाल्मिक कराड याचाही परवाना रद्द करण्यात आला असून लवकरात लवकर शस्त्र जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, कराड सध्या सीआयडीच्या कोठडीत आहे. त्यामुळे अद्याप ही नोटीस त्याला मिळालेली नाही. कोठडीतून बाहेर आल्यानंतर नोटीस त्याला दिली जाईल असे सांगण्यात आले.खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड विरोधात १५ गुन्हे दाखल आहेत. (Walmik Karad)

तत्कालीन पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शस्त्र परवान्यांचा पुनर्विचार करावा असा अहवाल पाठवला होता. आता वाल्मिक कराडवर कारवाई करत जिल्हाधिकाऱ्यांनी त्याला दणका दिला आहे.बीडमधील संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्याप्रकरणाची चौकशी सुरु झाल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अनेक दावे करुन व्हिडिओ शेअर केल्या होत्या. यामध्ये बीडमधील अनेक तरुणांचे बंदूक हातात घेताना, बंदुकीतून गोळ्या झाडतानाचे फोटो समोर आणले होते. बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर आणि व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील तरुणांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी सातत्याने केली जात होती.या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महत्त्वाचे आदेश दिले होते. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) बंदुकीसोबत ज्या कोणाचे फोटो आहेत, त्यांचे परवाने रद्द करा, असे आदेश दिले होते. यानंतर आता दोन आठवड्यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी 100 जणांना शस्त्र परवाना रद्द करण्याची नोटीस पाठवली आहे. (Walmik Karad)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.