Pandharpur च्या वारीतील गर्दीचे मॅनेजमेंट करण्यासाठी एआयची मदत घेणार

40
Pandharpur च्या वारीतील गर्दीचे मॅनेजमेंट करण्यासाठी एआयची मदत घेणार
Pandharpur च्या वारीतील गर्दीचे मॅनेजमेंट करण्यासाठी एआयची मदत घेणार

” छत्रपती शिवाजी महाराज चौकातली गर्दी कमी करा, दर्शन मंडपासमोरील गर्दी पुढे न्या, वारकरी मायबाप थांबू नका, चालत राहा, पुढे व्हा,” अशा सूचना देणारा पोलिस बांधव पंढरपूरच्या (Pandharpur) वारीत सर्वांच्या नजरेस हमखास पडतात. थांबलेली गर्दी, तसेच गर्दीमुळे संभाव्य चेंगराचेंगरी कमी करण्यासाठी वारी काळात पोलिसांवर प्रचंड तणाव असतो. हा तणाव कमी करण्यासाठी, तसेच आपत्कालीन घटना रोखण्यासाठी एआयचा वापर करता येईल. त्यासाठी आवश्यक सॉफ्टवेअर, तसेच २ कोटी निधीची मागणी सोलापूर (Solapur) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्य सरकारकडे केली आहे. (Pandharpur)

( हेही वाचा : Veteran Day 2025 : माजी सैनिक दिनाच्या परेडमध्ये ५०० हून अधिक माजी सैनिक सहभागी

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांनी सांगितले, सध्या आम्ही पंढरपूरची (Pandharpur) वारीच्या पार्श्वभूमीवर एआयसाठी (AI) आवश्यक सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी राज्य सरकारकडे परवानगी मागितली आहे. सॉफ्टवेअर तयार झाल्यानंतर त्याचा वापर देशातील कोणत्याही यात्रेत होऊ शकतो. हा देशातील पथदर्शी प्रकल्प ठरू शकतो. यामुळे अनियंत्रित गर्दीमुळे होणारी चेंगराचेंगरी थांबेल, आपत्कालीन घटना रोखता येतील, मनुष्यहानी थांबवता येईल, पोलिसांवरील तणाव कमी होईल, आवश्यकता उपाययोजना तात्काळ करता येईल, वारकऱ्यांना किंवा भक्तांना आवश्यक सोयी-सुविधा देता येतील. यासोबत पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा व्हीआयपींच्या दौऱ्यातसुद्धा या सॉफ्टवेअरचा वापर करता येईल. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. (Pandharpur)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.