Tree : झाडांच्या कत्तलीला मानवी हत्येसमान गंभीर गुन्हा मानावा; पर्यावरणवादी वांगचूक यांची मागणी 

34

झाडांना (Tree) माणसांप्रमाणेच जीव असतो आणि त्यांच्यापासून मिळणाऱ्या प्राणवायूमुळेच मानवी जीवन शक्य आहे. त्यामुळे झाडांच्या कत्तलीकडे मानवी हत्या म्हणून पाहण्यात यावे आणि त्याप्रमाणे कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांनी केली.

नागपूर महानगरपालिकेने ३६५ झाडे (Tree) तोडण्याची नोटीस काढली असून, त्यात ५० वर्षांहून जुनी ६० हेरिटेज झाडेही समाविष्ट आहेत. त्यांनी पर्यावरण संरक्षणासाठी सक्रिय भूमिका घेण्याचे आवाहन केले. जगप्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांनी नागपुरात झाडांच्या संरक्षणासाठी जोरदार आवाज उठवला आहे. मानकापूर परिसरात आयोजित ‘हेरिटेज ट्री वॉक’ दरम्यान त्यांनी झाडांच्या कत्तलीला हत्येसमान गंभीर गुन्हा मानून कारवाई करण्याची मागणी केली.

(हेही वाचा शरद पवारांनी दगा-फटक्याचे राजकारण केले म्हणून त्यांना २० फुट खाली जमिनीत गाडले; Amit Shah यांचा हल्लाबोल)

यावेळी प्राची माहुरकर, प्रो. आशीष झा आणि माधुरी कानेटकर यांनी मार्गदर्शन केले. सुमारे ६० जणांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी नागपूर प्लॉगर्सने विद्यार्थ्यांसह स्वच्छता मोहीम राबवली. वांगचूक यांनी परिसरातील वनस्पती आणि जैवविविधतेची पाहणी करून शहरी हिरवळ जपण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे आवाहन केले. उल्लेखनीय म्हणजे, सोनम वांगचूक यांनी नुकतेच लडाखला सहाव्या अनुसूचीचा दर्जा मिळावा यासाठी दिल्लीत १५ दिवस उपोषण केले होते. त्यांच्या इतर मागण्यांमध्ये लडाखला राज्याचा दर्जा, लोकसेवा आयोग स्थापना आणि लेह-कारगिलसाठी स्वतंत्र लोकसभा जागांचा समावेश होता.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.