Scientist Kidnapped : तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानकडून १६ अणूशास्त्रज्ञांचे अपहरण; पाकच्या चिंतेत वाढ

92
Scientist Kidnapped : तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानकडून १६ अणूशास्त्रज्ञांचे अपहरण; पाकच्या चिंतेत वाढ
Scientist Kidnapped : तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानकडून १६ अणूशास्त्रज्ञांचे अपहरण; पाकच्या चिंतेत वाढ

पाकिस्तानातील १६ अणूशास्त्रज्ञांचे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (Tehreek-e-Taliban Pakistan) या संघटनेने अपहरण केले आहे. या संघटनेने या संदर्भात एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी शास्त्रज्ञ (nuclear scientists) शाहबाज, ‘तुम्ही आतंकवाद्यांच्या अटी मान्य करा आणि आमची त्यांच्या तावडीतून सुटका करा’, अशी सरकारला विनंती करतांना दिसत आहेत. (Scientist Kidnapped)

(हेही वाचा – २०२५ ची सुरुवात भाजपा दिल्लीच्या विजयाने करेल; केंद्रीय मंत्री Amit Shah यांचे विधान)

तालिबानच्या नेत्याने म्हटले आहे की, आम्ही या अणूशास्त्रज्ञांचे अपहरण त्यांना हानी पोचवण्यासाठी नाही, तर आमच्या अटी मान्य करण्यासाठी केले आहे.

युरेनियमचीही लूट

तालिबानकडून (Taliban) केवळ पाकिस्तानच्या अणूशास्त्रज्ञांचे अपहरण करण्यात आलेले नाही, तर पाकिस्तानच्या सर्वांत मोठ्या युरेनियमच्या (Uranium) खाणीमधून मोठ्या प्रमाणात युरेनियमची लूटही करण्यात आली आहे. या युरेनियमचा वापर अणूबाँब बनवण्यासाठी होतो. (Scientist Kidnapped)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.