Nagpur-Goa Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गासाठी एमएसआरडीसीच्या पुन्हा हालचाली सुरू

97
Nagpur-Goa Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गासाठी एमएसआरडीसीच्या पुन्हा हालचाली सुरू
Nagpur-Goa Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गासाठी एमएसआरडीसीच्या पुन्हा हालचाली सुरू

सांगली आणि कोल्हापूरमधील शेतकरी, स्थानिकांच्या विरोधानंतर, निवडणुकांपूर्वी नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या (Nagpur-Goa Shaktipeeth Highway) भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय गुंडाळून पुन्हा शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची हालचाल सुरू झाली आहे. राज्य सरकारने (State Govt) प्रकल्पाला हिरवा कंदिल दाखवला असून सरकारच्या निर्देशानुसार प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) (MSRDC) पहिले पाऊल उचलले आहे. (Nagpur-Goa Shaktipeeth Highway)

असा असेल ‘शक्तिपीठ महामार्ग’
हा महामार्ग सुमारे 805 किलोमीटर लांबीचा असेल आणि महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधून जाणार आहे. ज्यात वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, आणि सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे. या महामार्गाच्या उभारणीसाठी अंदाजे 86,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 27,000 हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्याची योजना आहे. हा महामार्ग कोल्हापूरची करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी, तुळजापूरची तुळजाभवानी, आणि नांदेडमधील माहूरची रेणुकादेवी या तीन प्रमुख शक्तीपीठांना जोडेल, ज्यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल. (Nagpur-Goa Shaktipeeth Highway)

पर्यावरण परवानगीचा प्रस्ताव सरकारकडे
राज्य सरकारच्या मंजुरीनंतर एमएसआरडीसीने तात्काळ पाऊले उचलून तीन-चार दिवसांपूर्वीच प्रकल्पाच्या पर्यावरण परवानगीचा प्रस्ताव केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठविल्याची माहिती एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी एका वृत्तवाहिनीला दिली. दोन पॅकेजचा प्रस्ताव केंद्राकडे तर दोन पॅकेजचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आले आहेत. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर एमएसआरडीसीकडून पर्यावरण प्रभाव मूल्यांकन अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे ही परवानगी महत्त्वाची मानली जात आहे. या प्रकल्पाला जेथे विरोध आहे, तेथे संरेखनात बदल करून प्रकल्प मार्गी लावला जाईल, असा पुनरुच्चारही गायकवाड यांनी केला. (Nagpur-Goa Shaktipeeth Highway)

नागपूर ते गोवा 18 तासांवरून 8 तासांवर ?
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच या प्रकल्पाच्या भूसंपादनाचे काम सुरू झाले होते. 9385 हेक्टर जमीन लागणार प्रकल्पासाठी 9385 हेक्टर जमिनीचे भूसंपादन एमएसआरडीसीला करावे लागणार आहे. त्यामध्ये 265 हेक्टर वन जमिनीचा समावेश आहे. काही अहवालांनुसार, राज्य सरकारने भूसंपादनाच्या अधिसूचना रद्द केल्या होत्या. ज्यामुळे प्रकल्पाच्या भविष्यात अनिश्चितता निर्माण झाली होती. ती आता दूर झाली. या प्रकल्पामुळे नागपूर ते गोवा दरम्यानचा प्रवास सध्याच्या 18 तासांवरून 8 तासांवर येण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे राज्यातील दळणवळण आणि विकासाला मोठी चालना मिळेल. (Nagpur-Goa Shaktipeeth Highway)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.