Ratnagiri Bus Accident: रत्नागिरीत एसटी बसचा भीषण अपघात; बस दरीत कोसळून झाडात अडकली, धरणात पडता पडता वाचली

271
Ratnagiri Bus Accident: रत्नागिरीत एसटी बसचा भीषण अपघात; बस दरीत कोसळून झाडात अडकली, धरणात पडता पडता वाचली
Ratnagiri Bus Accident: रत्नागिरीत एसटी बसचा भीषण अपघात; बस दरीत कोसळून झाडात अडकली, धरणात पडता पडता वाचली

रत्नागिरीच्या (Ratnagiri) शेनाळे घाटात (Shenale Ghat) एका एसटी बसचा अपघात (Ratnagiri Bus Accident) झाल्याची माहिती समोर आली आहे. ही एसटी बस रविवारी (१२ जाने.) रात्री दाभोळवरुन मुंबईच्या दिशेने येत होती. त्यावेळी शेनाळे घाटातील एका तीव्र उतारावर चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस दरीत घरंगळत गेली. मात्र, त्याठिकाणी असणाऱ्या एका झाडाला धडकून बस तिथेच थांबली. ही बस आणखी पुढे घरंगळत गेली असती तर ती धरणात कोसळून मोठा अनर्थ घडला असता. (Ratnagiri Bus Accident)

हेही वाचा-Nagpur-Goa Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गासाठी एमएसआरडीसीच्या पुन्हा हालचाली सुरू

हा अपघात झाला त्यावेळी एसटी बस रविवारी रात्री मंडणगड शेनाळे घाटातून जात होती. या घाटात अतितीव्र उताराचा रस्ता आहे. यापैकी एका उतारावर एसटी बसवरील नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली. दरीतील झाडाझुडपांमधून ही एसटी बस खाली घरंगळत जात होती. बस दरीत कोसळताना प्रवाशांना जाग आली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. या दरीच्या खालच्या बाजुला धरण होते. ही एसटी बस आणखी खाली घरंगळत गेली असती तर थेट धरणात कोसळली असती आणि अनेक प्रवाशांचा जीव जाण्याची शक्यता होती. (Ratnagiri Bus Accident)

हेही वाचा-Maharashtra Weather : वातावरणातला गारठा वाढणार; राज्यात तापमान घसरण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?

दरीतील एका झाडला धडकून एसटी बस तिथेच अडकून पडली. यानंतर बचावपथकांनी घटनास्थळी धाव घेऊन एसटी बसमधील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. रात्रीची वेळ असल्यामुळे बसपर्यंत मदत पोहोचण्यास विलंब झाला. तोपर्यंत अनेक प्रवाशी बसमध्ये जीव मुठीत धरुन बसले होते. (Ratnagiri Bus Accident)

हेही वाचा-Scientist Kidnapped : तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानकडून १६ अणूशास्त्रज्ञांचे अपहरण; पाकच्या चिंतेत वाढ

ही बस दरीत कोसळल्यानंतर एका बाजुला पूर्णपणे आडवी पडली होती. प्रवासी ज्यांना शक्य आहे त्यांना बसमधून बाहेर पडा असे सांगत होते. जितक्या लोकांचा जीव वाचेल तेवढे जण वाचतील, तुम्ही बाहेर पडा, असे प्रवासी इतरांना सांगत होते. मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. हा अपघात नेमका कसा घडला, याबाबत अद्याप नेमकी माहिती समोर आलेली नाही. (Ratnagiri Bus Accident)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.