प्रयागराज (Prayagraj) येथे महाकुंभमेळ्याला पौष पौर्णिमेच्या निमित्ताने आरंभ झाला आहे. आज पहिले अमृतस्नान आहे. सकाळी १० वाजेपर्यंत सुमारे ६० लाख लोकांनी गंगास्नान केले आहे, पोलीस उपअधीक्षकांनी सांगितले.
१४४ वर्षांच्या दुर्मिळ खगोलीय संयोगाने महाकुंभ होत आहे. मुख्यमंत्री योगी यांनी पौष पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. गुगलनेही महाकुंभ संदर्भात एक खास फीचर सुरू केले आहे. (Maha Kumbh Mela 2025)
(हेही वाचा – Ratnagiri Bus Accident: रत्नागिरीत एसटी बसचा भीषण अपघात; बस दरीत कोसळून झाडात अडकली, धरणात पडता पडता वाचली)
आज दिवसभरात १ कोटी भाविक संगमात स्नान करणार आहेत, असा प्रशासनाचा अंदाज आहेत. एकट्या संगम नाक्यावर दर तासाला २ लाख लोक स्नान करत आहेत. आजपासूनच भाविक ४५ दिवसांच्या कल्पवासाला सुरुवात करणार आहेत. संगम नाक्यासह सुमारे १२ किमी परिसरात स्नान घाट बांधण्यात आला आहे. संगमावर सर्व प्रवेश मार्गांवर भाविकांची गर्दी आहे.
महाकुंभपर्वासाठी उभारलेल्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे भाविक १०-१२ किलोमीटर पायी चालत संगमावर पोहोचत आहेत. ६० हजार सैनिक सुरक्षा आणि सुव्यवस्था राखण्यात गुंतले आहेत. पोलिस कर्मचारी स्पीकरवरून लाखोंच्या संख्येने गर्दीचे व्यवस्थापन करत आहेत. कमांडो आणि निमलष्करी दलाचे जवानही ठिकठिकाणी तैनात आहेत.
कडाक्याच्या थंडीत परदेशी भाविकही न्हाऊन निघत आहेत. अॅपलचे सहसंस्थापक स्टीव्ह जॉब्स (Steve Jobs) यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्सही (Lauren Powell Jobs) महाकुंभला पोहोचल्या आहेत. निरंजनी आखाड्यात त्यांनी विधी केला. कल्पवासही करणार आहेत. (Maha Kumbh Mela 2025)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community