Mahakumbh 2025 चा प्रयागराजमध्ये शुभारंभ; PM Modi यांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले …

41
Mahakumbh 2025 चा प्रयागराजमध्ये शुभारंभ; PM Modi यांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले ...
Mahakumbh 2025 चा प्रयागराजमध्ये शुभारंभ; PM Modi यांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले ...

जगातील सर्वात मोठं धार्मिक आयोजनांपैकी एक महाकुंभ 2025 (Mahakumbh 2025) चा शुभारंभ आज (१३ जानेवारी) होत आहे. पुढील 45 दिवस सुरू असणाऱ्या या महाकुंभ मेळाव्यात 30 कोटींहून अधिक भाविक सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रयागराजमध्ये (Prayagraj) आज महाकुंभचा दिमाखदार शुभारंभ होणार असून पहिलं शाही स्नान आज पार पडणार आहे. पौष पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर 50 लाख भाविक गंगेत स्नान करणार आहेत. यावेळी पंतप्रधान मोदी (PM Modi) यांनी सर्व भाविक, संत, महात्मा, कल्पवासींचे स्वागत केले आणि महाकुंभाच्या पहिल्या स्नानासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. (Mahakumbh 2025)

हेही वाचा-Maha Kumbh Mela 2025 : प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला सुरुवात; १ कोटी भाविक करणार अमृतस्नान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरुन पोस्ट करत महाकुंभासाठी आलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘भारतीय मूल्ये आणि संस्कृती जपणाऱ्या करोडो लोकांसाठी हा दिवस खूप खास आहे! महाकुंभ २०२५ ची सुरुवात प्रयागराजमध्ये होत आहे, जी श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीच्या पवित्र संगमावर असंख्य लोकांना एकत्र आणेल. महाकुंभ हा भारताच्या कालातीत अध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे आणि विश्वास आणि सौहार्दाचा उत्सव आहे.’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे. (Mahakumbh 2025)

हेही वाचा- Nagpur-Goa Shaktipeeth Highway : शक्तिपीठ महामार्गासाठी एमएसआरडीसीच्या पुन्हा हालचाली सुरू

“पौष पौर्णिमेला पवित्र स्नान करून प्रयागराज या पवित्र ठिकाणी आजपासून महाकुंभाला सुरुवात झाली आहे. आपल्या श्रद्धा आणि संस्कृतीशी संबंधित या दिव्य प्रसंगी, मी सर्व भक्तांना मनापासून नमस्कार आणि अभिनंदन करतो. भारतीय अध्यात्मिक परंपरेचा हा भव्य सण तुम्हा सर्वांच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि उत्साह संचारेल अशी आमची इच्छा आहे,” असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. (Mahakumbh 2025)

45 हजार पोलीस कर्मचारी तैनात..
सुरक्षेचा विचार करता यंदा सुरक्षेत 55 हून अधिक फोर्स सामील झाले आहेत. या आयोजनादरम्यान तब्बल 45,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. हरवलेल्या आणि सापडलेल्या व्यक्तींची माहिती संगणकात नोंदवली जाईल आणि माहिती देणाऱ्याला संगणकीकृत पावती दिली जाईल. बेपत्ता व्यक्तींचे फोटो आणि तपशील एका मोठ्या 55 ​​इंचाच्या एलईडी स्क्रीनवर प्रसारित केले जातील. सर्व केंद्रे आधुनिक संपर्क प्रणालीद्वारे एकमेकांशी जोडलेली आहेत. फेसबुक, एक्स, व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे देखील माहिती प्रसारित केली जाईल. (Mahakumbh 2025)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.