50 Years of Wankhede Stadium : मुंबईच्या रणजी संघाच्या कर्णधारांचा वानखेडे मैदानावर ह्रद्य सत्कार, कांबळी, पृथ्वीने वेधून घेतलं लक्ष 

50 Years of Wankhede Stadium : मुंबई क्रिकेट असोसिएशन वानखेडे स्टेडिअमचा ५० वा वर्धापनदिन साजरा करत आहे 

101
50 Years of Wankhede Stadium : मुंबईच्या रणजी संघाच्या कर्णधारांचा वानखेडे मैदानावर ह्रद्य सत्कार, कांबळी, पृथ्वीने वेधून घेतलं लक्ष 
50 Years of Wankhede Stadium : मुंबईच्या रणजी संघाच्या कर्णधारांचा वानखेडे मैदानावर ह्रद्य सत्कार, कांबळी, पृथ्वीने वेधून घेतलं लक्ष 
  • ऋजुता लुकतुके

मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडिअमला यंदा ५० वर्षं पूर्ण होत आहेत. त्या निमित्ताने मुंबई क्रिकेट असोसिएशनने विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. मुख्य सोहळा १९ जानेवारीला होणार आहे. पण, त्यापूर्वी रविवारी एमसीएतर्फे मुंबईच्या रणजी कर्णधारांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सुनील गावसकर, विनोद कांबळी, वसिम जाफर, पृथ्वी शॉ असे मुंबईकर खेळाडू या सोहळ्याला उपस्थित होते. एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी सुनील गावसकर यांना स्मृतीचिन्ह भेट दिलं. (50 Years of Wankhede Stadium)

(हेही वाचा-Maha Kumbh Mela 2025 : तीर्थराज प्रयागला येऊन मनुष्यजीवनाचे सार्थक करा; महंत अनिकेतशास्त्री यांचे आवाहन )

‘वानखेडे स्टेडिअमसारख्या ऐतिहासिक स्टेडिअममध्ये माझा सत्कार होतोय, ही गोष्टच माझ्यासाठी लाख मोलाची आहे. या मैदानाने भारतीय क्रिकेटला इतकं सारं दिलंय. २०१२ चा विश्वचषक अंतिम सामनाही इथंच झाला होता. आणि भारताने तो जिंकला होता. आणखी काय पाहिजे? अशा ठिकाणी माझी आठवण ठेवावी, यातच मी भरून पावलो,’ असं गावसकर सत्काराला उत्तर देताना म्हणाले. (50 Years of Wankhede Stadium)

 विनोद कांबळीला नुकतंच सतत चक्कर येत असल्यामुळे ठाण्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तो आता बरा होऊन घरी आला आहे. या कार्यक्रमात बोलताना मुंबईत इंग्लंड विरुद्ध ठोकलेल्या द्विशतकाची आठवण कांबळीला झाली. या सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम १९ जानेवारीला वानखेडे मैदानावरच होणार आहे. आणि त्यासाठी सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, दिलीप वेंगसरकर आणि रवी शास्त्रीही उपस्थित राहणार आहेत. (50 Years of Wankhede Stadium)

(हेही वाचा- Champions Trophy 2025 : जसप्रीत बुमराह अख्ख्या चॅम्पियन्स करंडकाला मुकण्याची शक्यता )

रविवारी झालेल्या कार्यक्रमात विनोद कांबळी आणि पृथ्वी शॉ यांनी एकमेकांशी संवाद साधला. कांबळी अलीकडे प्रकृती अस्वास्थ्याशी झुंजतोय. तर पृथ्वी शॉला तंदुरुस्तीच्या कारणास्तव मुंबईच्या सय्यद मुश्ताक अली आणि विजय हजारे चषकातून वगळण्यात आलं होतं. त्यानंतर पृथ्वी शॉ पहिल्यांदाच जाहीर कार्यक्रमात दिसला. (50 Years of Wankhede Stadium)

 पृथ्वी शॉ आयपीएलच्या लिलावातही विक्रीशिवाय राहिला. तो कार्यक्रमाला आला तेव्हा कांबळी सर्वप्रथम त्याच्यापाशी गेला. आणि त्याने आस्थेनं पृथ्वीची चौकशी केली. हा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. (50 Years of Wankhede Stadium)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.