- ऋजुता लुकतुके
इंडियन प्रिमिअरच्या नवीन हंगामात पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) असणार आहे. गंमत म्हणजे श्रेयस फ्रँचाईजीचा नवीन कर्णधार असेल ही घोषणा किंवा माहिती लोकांना मिळाली ती बिग बॉस या रियालिटी कार्यक्रमातून. बॉलिवूड अभिनेता सलमान खान होस्ट असलेल्या या कार्यक्रमात श्रेयस अय्यर आपले दोन साथीदार शशांक सिंग आणि यजुवेंद्र चहल यांच्यासह सहभागी झाला होता. ३० वर्षीय श्रेयसने (Shreyas Iyer) आपल्या निवडीविषयी समाधान व्यक्त केलं आहे आणि आपल्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवू असा भरवसा संघ प्रशासनाला दिला आहे.
(हेही वाचा – BCCI Working Committee : बीसीसीआय कार्यकारिणीत देवाजित साकिया सचिव तर प्रभतेज सिंग भाटिया यांची खजिनदार म्हणून बिनविरोध निवड)
𝐒𝐡𝐫𝐞𝐲𝐚𝐬 𝐈𝐲𝐞𝐫 ➡️ 𝐓𝐡𝐞 𝐜𝐡𝐨𝐬𝐞𝐧 𝐨𝐧𝐞! ©️♥️#CaptainShreyas #SaddaPunjab #PunjabKings pic.twitter.com/EFxxWYc44b
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) January 12, 2025
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स कडून खेळला आणि त्याने नेतृत्व करताना संघाला आयपीएल करंडक जिंकूनही दिला. पण, कोलकाता संघाने श्रेयसला संघात कायम ठेवलं नाही. त्यानंतर झालेल्या लिलावात श्रेयसला सर्वोच्च किंमत मिळाली आणि तो पंजाबकडे गेला आहे. आता पुढील तीन वर्षांसाठी तो पंजाब किंग्जकडून खेळेल.
‘पंजाब किंग्जने माझ्या नेतृत्वावर भरवसा दाखवला याचा मला आनंद आहे. पुन्हा एकदा प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्याबरोबर काम करायला मिळणार म्हणूनही मी उत्सुक आहे. संघ खूप छान आहे. त्यांच्याबरोबर काम करायला मजा येईल,’ असं श्रेयसने (Shreyas Iyer) एका व्हिडिओत बोलून दाखवलं आहे.
(हेही वाचा – 50 Years of Wankhede Stadium : मुंबईच्या रणजी संघाच्या कर्णधारांचा वानखेडे मैदानावर ह्रद्य सत्कार, कांबळी, पृथ्वीने वेधून घेतलं लक्ष )
#𝐒𝐚𝐝𝐝𝐚𝐒𝐪𝐮𝐚𝐝 🔒❤️#IPL2025Auction #PunjabKings pic.twitter.com/Mxppagzd4Z
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) November 25, 2024
श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) सध्या भारतीय संघातही पुनरागमन करण्याच्या प्रयत्नांत आहे. त्यासाठी रणजी आणि इतर देशांतर्गत हंगामात त्याने चमक दाखवली आहे आणि आताही इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत तो संघाचे दरवाजे ठोठावत आहे. त्याने कोलकाताला आयपीएल करंडक जिंकून दिला. तसंच मुंबईला रणजी करंडक आणि सय्यद मुश्ताक करंडक जिंकून देण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे. आयपीएल लिलावात त्याला पंजाबने २६.९५ कोटी रुपये देऊन विकत घेतलं आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community