-
ऋजुता लुकतुके
भारतीय बुद्धिबळ क्षेत्रातील ताज्या दमाचे खेळाडू डी गुकेश, प्रग्यानंदा, विदित गुजराथी आणि अर्जुन एरिगसी यांच्यासाठी यंदाचा पोंगल सण वेगळा ठरला. त्यांचे मार्गदर्शक आणि पाचवेळा बुद्धिबळ जगज्जेता ठरलेला विश्वनाथन आनंद याच्या घरी चेन्नईला या खेळाडूंनी एकत्र पोंगल साजरा केला. आणि चक्क पारंपरिक नाचही केला. देशाचे हे आजी – माजी खेळाडू तामिळ वेष्टी म्हणजे सफेद लुंगीत होते. काही क्षणातच हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Viswanathan Anand)
(हेही वाचा- Chandrapur येथील मंदिरात चोरी; बंदुकीचा धाक दाखवून फोडली दानपेटी)
पोंगल हा तामिळ नववर्षदिन आहे. आणि यंदाचं वर्ष या खेळाडूंसाठी बरंच काही नवीन घेऊन येणार आहे. डी गुकेश यावर्षी जगज्जेता असेल. तर अर्जुन एरिगसीने २,८०० एलो रेटिंग गुण पार केले आहेत. आणि ही कामगिरी करणारा तो फक्त दुसरा भारतीय आहे. तर बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्येही भारतीय संघाने सुवर्ण पटकावलं आहे. आणि ही कामगिरी आनंद यांच्या मार्गदर्शनाखालीच संघाने केली आहे. (Viswanathan Anand)
Impromptu dance ft. @vishy64theking @DGukesh @rpraggnachess @viditchess @sagarchess1 @ChessbaseIndia and others! pic.twitter.com/ZIzwKaqRMd
— Chess.com – India (@chesscom_in) January 12, 2025
विश्वनाथन आनंद चेन्नईतच वेस्टब्रिज – आनंद बुद्धिबळ अकॅडमी चालवतो. प्रग्यानंदा आणि गुकेश तिथे पूर्णवेळ प्रशिक्षण घेतात. तर एरिगसी आणि विदितनेही ऑलिम्पियाडपूर्वी आनंदचं मार्गदर्शन घेतलं होतं. गुकेशने तर अलीकडेच डिंग लिरेनला हरवून जगज्जेतेपद पटकावलं आहे. १९ वर्षं आणि १६५ दिवसांचा गुकेश जगातील वयाने सगळ्यात लहान जगज्जेता आहे. आता नवीन वर्षी तो नेदरलँड्स इथं टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा खेळणार आहे. ही स्पर्धा १७ जानेवारीपासून सुरू होईल. (Viswanathan Anand)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community